शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक; गोलंदाजीत अकिल होसीन इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

शाळांवर केरळचे २0 टक्के शिक्षक!

By admin | Updated: July 6, 2015 23:58 IST

सीबीएसईचे आकर्षण; विदर्भात शाळांचे जाळे वाढले.

ब्रम्हानंद जाधव/ मेहकर: विदर्भात इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे प्रस्थ वाढत असून, सीबीएसई बोर्डाच्या शाळांची संख्या १00 वर जाऊन पोहोचली आहे. सीबीएसई बोर्डाच्या शाळेवर इंग्रजीचे प्रभुत्व असलेल्या शिक्षकांची नियुक्ती करण्यासाठी संस्थाचालक केरळच्या शिक्षकांचा भरणा करीत आहेत. नवीन शैक्षणिक वर्षात विदर्भातील सीबीएसईच्या शाळांवर केरळच्या शिक्षकांचे २0 टक्के प्रमाण असल्याने पालकांचाही कल आता कॉन्व्हेंटकडून सीबीएसईकडे वळत आहे. स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी प्रत्येक पालक आपल्या पाल्याला इंग्रजी शाळेत घालत आहे. शहरापाठोपाठ ग्रामीण भागातही इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे जाळे पसरले आहे. इंग्रजी माध्यमामध्येही गत तीन ते चार वर्षांंपासून सीबीएसई बोर्डाच्या शाळांकडे पालकांचा कल अधिक आहे. सीबीएसई बोर्डाच्या एकूण १५ हजार ७९९ शाळा आहेत. त्यापैकी विदर्भात १00 च्या आसपास सीबीएसईच्या व सीबीएसईशी संलग्नीत शासकीय व खासगी शाळा आहेत. विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात सीबीएसईच्या व सीबीएसईशी संलग्नीत शाळा निर्माण झाल्या असून, या शाळेचे संस्थाचालक पटसंख्या वाढविण्यासाठी वेगवेगळे फंडे वापरताना दिसून येत आहेत. सीबीएसईच्या शाळांवर इंग्रजीवर प्रभुत्व असलेल्या शिक्षकांची गरज असल्याने अनेक संस्थाचालकांनी आपल्या शाळेवर केरळच्या शिक्षकांचा भरणा केलेला आहे. विदर्भातील १00 च्यावर असलेल्या सीबीएसईच्या व सीबीएसईशी संलग्नीत शाळांमध्ये सुमारे २0 टक्के शिक्षक हे केरळचे आहेत. विदर्भातील इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे ग्रामीण भागात ह्यमिशन अँडमिशनह्ण अजूनही सुरू आहे. ज्या शाळेकडे केरळचे पदविधारक शिक्षक आहेत, त्या शाळांवर पालकांचाही ओढा अधिक आहे. सीबीएसई बोर्डाच्या शाळा वाढत असल्याने कॉन्व्हेंटमधील विद्यार्थ्यांनीही आता सीबीएसईच्या शाळांची वाट धरली आहे.