शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

बलात्कारप्रकरणी आरोपीला १0 वर्षे सश्रम कारावास

By admin | Updated: April 30, 2017 02:47 IST

आरोपीला मदत करणा-या काकुलाही शिक्षा

खामगाव : बलात्कार करुन अल्पवयीन कुमारिकेवर मातृत्व लादणार्‍या आरोपीला जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी दहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. आरोपीला मदत करणार्‍या त्याच्या काकुलाही न्यायालयाने हीच शिक्षा ठोठावली आहे.सातळी ता. जळगाव जा.येथील पंधरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर नात्याने तिचा भाऊ असलेल्या विशाल दगडू गवई (वय १८) याने गतवर्षी एप्रिल महिन्यात आपल्या घरी बोलावून बलात्कार केला होता. यावेळी त्याची काकु रेखा शेषराव गवईने आरोपीला मदत केली. यानंतर आरोपीने तिला शेतात नेऊन बलात्कार केला. दरम्यान, सदर मुलीला गर्भधारणा झाली. पाच ते सहा महिन्याची गर्भवती असलेल्या पीडीत मुलीला अकोला येथील चाईल्ड हेल्पलाईनमध्ये पाठविण्यात आले. तेथे पीडीतेने मुलीस जन्म दिल्यानंतर करण्यात आलेल्या डीएनए चाचणीमध्ये विशाल गवई हा दोषी असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर याप्रकरणी १३ सप्टेंबर २0१४ रोजी सदर मुलीच्या आईने जळगाव जामोद पोलिस स्टेशनला फिर्याद दिली होती. हे प्रकरण न्यायप्रविष्ट झाल्यानंतर शनिवारी जिल्हा व सत्र न्यायालय क्र.१ चे न्या. सुर्यवंशी यांनी दिला.