एका संवेदनशील पोलीस अधिका-यांच्या समयसूचकतेने ‘आॅटिझम’ग्रस्त मनीषचे बहरले आयुष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2017 06:20 PM2017-10-19T18:20:22+5:302017-10-19T18:22:34+5:30

‘घरची उपाशी परिस्थिती आणि या मुलाच्या आजाराला कंटाळून या मुलाला अनाथ सोडून देत आहे. माफ करावे’, अशी चिठ्ठी आणि ३०० रुपये खिशात असणा-या १० ते ११ वर्षांच्या मुलाला अलिबागमधील रिक्षाचालक अनंत दामोदर शेलार यांनी गतवर्षी ७ डिसेंबर २०१६ रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास अलिबाग पोलीस ठाण्यात आणले

At the time of a sensitive police officer's autism, the blossoming life of the rich man | एका संवेदनशील पोलीस अधिका-यांच्या समयसूचकतेने ‘आॅटिझम’ग्रस्त मनीषचे बहरले आयुष्य

एका संवेदनशील पोलीस अधिका-यांच्या समयसूचकतेने ‘आॅटिझम’ग्रस्त मनीषचे बहरले आयुष्य

जयंत धुळप
‘घरची उपाशी परिस्थिती आणि या मुलाच्या आजाराला कंटाळून या मुलाला अनाथ सोडून देत आहे. माफ करावे’, अशी चिठ्ठी आणि ३०० रुपये खिशात असणा-या १० ते ११ वर्षांच्या मुलाला अलिबागमधील रिक्षाचालक अनंत दामोदर शेलार यांनी गतवर्षी ७ डिसेंबर २०१६ रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास अलिबाग पोलीस ठाण्यात आणले आणि अलिबाग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांच्यासह पोलीस ठाण्यातील सारेच अधिकारी व पोलीस यांचे -हदय हेलावून गेले आणि तेथेच अलिबाग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांच्यातील संवेदनशील माणूस जागा झाला.
मुलाला रिक्षातच बसून ते गृहस्थ झाले गायब....
अलिबाग शहरातील जोगळेकर नाका येथे संध्याकाळी सात वाजण्याच्या सूमारास रिक्षाचालक अनंत दामोदर शेलार यांच्या रिक्षामध्ये एक ११ वर्षाच्या मुलासह एक ४५ ते ५० वयाचे गृहस्थ येवून बसले. त्यांनी त्यांना अलिबाग समुद्र चौपाटीवर सोडण्यास सांगीतले. तेथे पोहोचल्यावर त्या गृहस्थांनी, मुलाला रिक्षातच बसूद्या मी आमच्या बरोबरचे दोघे समुद्रावर आहेत त्यांना घेवून येतो, अशे रिक्षा चालक शेलार यांना सांगून, समुद्रावर गेले. एक तास झाला तरी ते गृहस्थ वा अन्य कोणीही रिक्षाकडे परत आले नाही. त्यांनी रिक्षात बसलेल्या मुलाला या बाबत विचारले तर तो मुलगा काही बोलत नव्हता. केवळ मान हलवून हो किवा नाही असे उत्तर देत होता. त्यावरील शेलार यांनी अंदाज केला हा मुलगा मुका असवा आणि काहीसा मानसिक रुग्ण असावा.
तो केवळ ‘म’ हे एकच अक्षर लिहितो...
अत्यंत संवेदनशिलतेने हळूवार त्या मुलाकडून माहिती काढण्याचा प्रयत्न केला. वराडे यांनी अलिबागमधील समुपदेशक अश्विनी निर्भवणे यांची मदत घेऊन मुलाशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. त्याला बोलता येत नाही म्हणून त्याला लिहून सांगण्याकरीता पेन दिले असता तो केवळ ‘म’ हे एकच अक्षर लिहू शकत होता. अखेर वराडे त्यामूलाचे फोटो काढून तत्काळ अलिबाग परिसरा लगतच्या सर्व पोलीस ठाण्यात व्हॉट्सअ‍ॅप द्वारे त्पाठवले, परंतू असा कोणी मुलगा हरवल्याची वा कोणी पाहील्याची माहिती मिळाली नाही.
लोकमत आॅनलाइनमुळे मुलाची अखेर ओळख पटली
वराडे यांच्याकडून या मुलाचा फोटो लोकमतला प्राप्त झाला. त्या फोटोसह ‘लोकमत-आॅनलाइन’वर रात्री बातमी प्रसिद्ध झाली. ती बातमी मुलाच्या मामाने पाहून त्या मुलाच्या आई-वडिलांना कळवले आणि अखेर दुस-या दिवशी सकाळी त्या मुलाचे वडील अलिबाग पोलीस ठाण्यात दाखल झाले.आणि झालेला उलगडा मोठा धक्कादायक होता. पनवेल जवळचा खांदा गावांत राहाणारे रिक्षा चालक जयंत हुद्दार यांचा हा मुलगा, त्याचे नाव मनिष. मनिष मतिमंद असून तो घरात सतत तोड फोड करतो, त्यांचा त्रास घरातल्यांबरोबर सोसायटीत राहणा-या सर्वांना होतो. शेजाºयांच्या सतत तक्रारी येतात. त्यांच्या आईला तो बेदम मारहाण करतो. आईला तर वेडलागण्याची पाळी आलीय. पाच ते सहा लाख रुपये खर्च उपचाराकरिता केला पण त्यांचा काहीही फायदा झाला नाही. अखेर त्यांला अलिबागच्या चौपाटीवर सोडून देवून मी निघून गेला होतो, अशी वास्तव कहाणी डोळ्यातील पाणि पुसत पुसत मनीष वडील जयंत हुद्दार यांनी वराडे यांना सांगितली. आणि सारेच निशब्द झाले.
‘लोकमत-आॅनलाइन’चा माध्यमातून गवसले ‘कॅनडा’स्थित भारतीय नागरिकाचे सहकार्य
दरम्यान कॅनडामध्ये राहणारे मूळ भारतीय असलेले एक नागरिक (नाव प्रसिद्ध करु नये अशी त्यांची सुचना आहे)यांनी ‘लोकमत-आॅनलाईन’वरील मनिषची ही सारी कथा आणि त्याला मदत करणा-या पोलीस निरिक्षक वराडे यांनी संवेदनशिलता बातमीत वाचली. आणि बातमीमध्ये असलेल्या वराडे यांच्या मोबाईल नंबरवर त्यांच्याशी संपर्क साधला. मनिषचा पूढील संपूर्ण आयूष्यभराची व्यवस्था आणि खर्च करण्यास आपण तयार असल्याचे सांगीतले. मनीष मतीमंद नाही तर तो आॅटीझम ग्रस्त असण्याचा अंदाज त्यांनी व्यक्त करुन, त्याला मुंबईतील हिन्दूजा हॉस्पिटल मध्ये घेऊन जाण्यास सांगितले.
मनीषच्या ‘आॅटिझम’ग्रस्ततेवर झाले शिक्कामोर्तब
कॅनडास्थित भारतीय नागरीकांने सांगितल्याप्रमाणे सत्वर हिन्दूजा हॉस्पिटलमध्ये मनीषला पाठविण्याची व्यवस्था वराडे यांनी केली. तेथे हैद्राबाद मध्ये ‘आॅटिझम’ग्रस्त मुलांचा सांभाळ, उपाय आणि पुनर्वसन करण्याकरिता सेवाभावी वृत्तीने ‘हैदराबाद आॅटिझम सेंटर’चालविणारे अनिल कुंद्रा दाम्पत्य हे मनिषच्या वडिलांना भेटले. त्यांच्याच सहकार्याने मनिषच्या सर्व आवश्यक चाचण्या डॉक्टरांनी केल्या आणि मनिष मतीमंद नाही तर तो आॅटीझम ग्रस्त असल्याचे कॅनडास्थित नागरिकांनी वर्तवलेला अंदाज खरा ठरला.


आणि हैदराबादच्या सेंटरमध्ये मिळाला प्रवेश आणि बहरले आयुष्य
आणि अखेर मनिषला ‘हैद्राबाद आॅटिझम सेंटर’मध्ये अनिल कुंद्रा यांनी प्रवेश दिला आणि गेल्या वर्षभराच्या काळात मनिषचे आयूष्यच बहरुन गेले. तो तेथील अन्य आॅटिझमग्रस्त मुलांमध्ये मिसळू गेला आहे. झाडांना पाणि घालण्यात त्यांला मोठा आनंद मिळतोय तर भाजी कापून देण्यातील त्याचा आनंद मोठा असल्याचे अनिल कुंद्रा यांनी मनिषच्या वडिलांना पाठविलेल्या विविध मेसेज मधून अनूभवास आले. कॅनडास्थीत त्या दानशून भारतीय नागरिकाच्या घरात एक आॅटिझमग्रस्त मुलगा आहे, तो देखील कुंद्रा यांच्याच ‘हैद्राबाद आॅटिझम सेंटर’मध्येच आहे. आणि त्यामूळेच त्यांना मनिषशी लक्षणे लोकमत आॅनलाईनची बातमी वाचून लक्षात आली. त्यांनी मनिषचाही पूढील सार खर्च उचलला आहे.
मनीषच्या वडिलांनी पाणावलेल्या डोळ्यांनी व्यक्त केले आभार
अलिबागचे संवेदनशिल वरिष्ठ पोलीस निरिक्षक सुरेश वराडे आणि लोकमत आॅनलाईन यांच्या माध्यमातून मनिषच्या आयूष्य बदलाची सुरु झालेली प्रक्रीय अखेर यशस्वी झाली आणि त्यास जवळपास एक वर्ष झाले. हुद्दार कुटूंबात यंदा तब्बल आठ ते दहा वर्षांनी दिवाळीचा सण आनंदात होत आहे. या आनंदात सहभागी करुन घेण्यासाठी आणि दिवाळी शुभेच्छासह आभार व्यक्त करण्याकरीता मनिषचे वडिल जयंत हूद्दार अलिबाग पोलीस ठाण्यात आले तर त्यांना भावनावेगामूळे शब्द फूटत नव्हते. वराडे साहेबांचे हात हातात घेवून केवळ डोळ््यांनीच त्यांनी आभार व्यक्त केले, आणि उपस्थित सर्वांना आयूष्यात कधीही विसराता येणार नाही अशा दिवाळीचा आनंद गवसला.
-----------------------------------------------------------------------
आॅटिझम अर्थात स्वमग्नतेचा मनोविकार
आॅटिझम म्हणजे स्वमग्नता हा एक प्रकारचा मनोविकार म्हणून ओळखला जातो. याचे पूर्ण नामस्वरुप ‘सायकोन्यूरोलॉजिकल डेव्हलपमेंटल डिसआॅर्डर’ असे आहे. इंग्रजीत त्याला ‘आॅटिझम’ म्हणतात. ही एक गुंतागुंतीची मानिसक स्थिती आहे. स्वमग्नता वा आॅटिझम ही जन्मस्थ अवस्था आहे. तो रोग नाही, अशी माहिती राष्ट्रीय बालरोग तज्ज्ञ परिषदेचे सदस्य ज्येष्ठ बालरोग तज्ज्ञ डॉ.चंद्रसेखर दाभाडकर यांनी दिली आहे.
आॅडिझम चा शोध लिओ केनर यांनी सन १९४३ मध्ये लावला. आॅटिझम ग्रस्त व्यक्ती आपल्याच विश्वात आणि विचारात रममाण असतात. प्रसंगी त्या दंगा करु शकतात. त्या व्यक्ती संवेदनांचे अर्थ लावू शकत नाहीत. त्यामुळे त्यांना त्यावर प्रतिक्रि या देता येत नाही. स्वमग्नता हे विकाराचे एक लक्षण आहे. परंतु हे एक लक्षण म्हणजे पूर्ण विकार असे म्हणता येणार नाही म्हणून ही गुंतागुंतीची मानिसक स्थिती आहे,असे डॉ.दाभाडकर यांनी अखेरीस सांगीतले.

Web Title: At the time of a sensitive police officer's autism, the blossoming life of the rich man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस