रेशनदुकानदारांचा संप अखेर मागे
रेशनदुकानदारांचा संप अखेर मागे

नाशिक : राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता धान्य वितरणप्रणालीत कोणतीही त्रुटी राहू नये या पार्श्वभूमीवर रेशनदुकानदार संघटनेने पुकारलेला संप अखेर मागे घेण्यात आला आहे. दरम्यान, येत्या दि. १० तारखेपूर्वी केंद्रीय अन्न व पुरवठामंत्र्यांसोबत चर्चा होणार असल्याने त्यातून सकारात्मक तोडगा निघू शकेल, असा आशावाद व्यक्त केला जात आहे.
आॅल महाराष्ट्र फेअर फ्राइज शॉप किपर फेडरेशन पुणे व नाशिक जिल्हा रास्त भाव दुकानदार व किरकोळ केरोसीन परवानाधारक संघटन (नाशिक) यांच्यासमवेत राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांच्याशी चर्चा करण्यात आली. यावेळी झालेल्या बैठकीत राज्य अध्यक्ष माजी खासदार गजानन बाबर, जनरल सेक्रे टरी बाबूराव ममाने, विभागीय अध्यक्ष गणपत डोळसे पाटील, नाशिक जिल्हाध्यक्ष निवृत्ती कापसे, सचिव माधव गायधनी, संपर्क प्रमुख दिलीप नवले, कार्याध्यक्ष अशोक बोराडे, मालेगाव अध्यक्ष निसार शेख उपस्थित होते.
यावेळी झालेल्या चर्चेत निवडणूक आचारसंहितेच्या आत साधाराणपणे १० तारखेच्या आगोदर केंद्रीय अन्न व पुरवठामंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थिती बैठक घेऊन दुकानदारांना कमीशन वाढ व मानधन देण्याच्या निर्णयावर चर्चा होण्याची शक्यता वर्तविण्यात आली. दरम्यान, राज्यातील आलेली पूरपरिस्थितीमुळे रेशन कार्डधारक धान्यापासून वंचित राहू नये यासाठी राज्यातील संप मागे घेण्यात येत असल्याची घोषणा माजी खासदार गजानन बाबर यांनी केली. यावेळी निसार शेख, मीनाताई लोखंडे, के. के. खान, मुबारक मोलवी, रज्जाक पठाण, नितीन पेंटर, सुनील पेंटर उपस्थित होते.


Web Title:  The backbone of rational shopkeepers is finally back
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.