शिकाऊ वाहन चालक परवाना देण्यासाठी लाच घेणाऱ्या दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2019 23:38 IST2019-02-11T23:36:26+5:302019-02-11T23:38:14+5:30

ठाण्याच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयातून (आरटीओ) शिकाऊ वाहन परवाना मिळवून देण्यासाठी एका 20 वर्षीय तरुणाकडे विटावा येथील किशोर नवलमल याने 7 फेब्रुवारी 2019 रोजी अडीच हजार रुपयांची मागणी केली.

Both arrested for taking a bribe for a learner's driver's license were arrested | शिकाऊ वाहन चालक परवाना देण्यासाठी लाच घेणाऱ्या दोघांना अटक

शिकाऊ वाहन चालक परवाना देण्यासाठी लाच घेणाऱ्या दोघांना अटक

ठाणे - शिकाऊ वाहन चालक परवाना आरटीओ कार्यालयातून मिळवून देण्यासाठी तीन हजारांची मागणी करुन 1200 रुपये स्वीकारणाऱ्या किशोर जैन (53, रा. विटावा, ठाणे) आणि समीर काझी (34, रुपादेवी पाडा क्रमांक दोन, वागळे इस्टेट, ठाणे) दोघांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज दुपारी 1 वाजताच्या सुमारास अटक केली. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठाण्याच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयातून (आरटीओ) शिकाऊ वाहन परवाना मिळवून देण्यासाठी एका 20 वर्षीय तरुणाकडे विटावा येथील किशोर नवलमल याने 7 फेब्रुवारी 2019 रोजी अडीच हजार रुपयांची मागणी केली. तर त्याचा साथीदार काझी याने तीन हजारांची मागणी केली. फोनवरुन झालेल्या या संभाषणाची चालक परवाना काढणाऱ्या या तरुणाने रेकॉर्डिंग केली. ती त्याने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे देऊन त्याबाबत रितसर तक्रारही केली. ही तक्रार दाखल झाल्यानंतर आज दुपारी 1 वाजताच्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून 1200 रुपयांची लाच स्वीकारतांना जैन आणि काझी यांना अटक केली. यामध्ये आरटीओ कार्यालयातील कोणाचा संबंध आहे किंवा कसे याचाही तपास करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.  

Web Title: Both arrested for taking a bribe for a learner's driver's license were arrested