Blog : आम्ही IPL'वीर'! फायनलच्या तयारीसाठी वेळ न मिळाल्याच्या पळ'वाटा'...

By स्वदेश घाणेकर | Published: June 11, 2023 09:44 PM2023-06-11T21:44:03+5:302023-06-11T21:44:45+5:30

भारतीय संघाचा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला... पराभव झाला याचे आश्चर्च अजिबात वाटले नाही, पण ज्या प्रकारे हरलो ते लाजीरवाणे नक्कीच आहे...

 Blog : Key reasons behind Team India's fiasco in Word Test Championship final against Australia | Blog : आम्ही IPL'वीर'! फायनलच्या तयारीसाठी वेळ न मिळाल्याच्या पळ'वाटा'...

Blog : आम्ही IPL'वीर'! फायनलच्या तयारीसाठी वेळ न मिळाल्याच्या पळ'वाटा'...

googlenewsNext

भारतीय संघाचा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला... पराभव झाला याचे आश्चर्च अजिबात वाटले नाही, पण ज्या प्रकारे हरलो ते लाजीरवाणे नक्कीच आहे... ज्या खेळपट्टीवर एक संघ ४६९ धावा उभ्या करतो, त्याच्या प्रत्युत्तरात आपल्याला ३००+ धावाही करता न येणं ही खंत आहे... रोहित शर्मा, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा अशी मोठी नावं संघात असूनही आपण ढेपाळलो... शुबमन गिल फॉर्मात आहे, परंतु त्याच्यावर दुसऱ्या डावात अन्याय झाला. अजिंक्य रहाणेने पुनरागमन करताना दोन्ही डावांत लाज वाचवण्याचा प्रयत्न केला. पण, त्याला साथ मिळाली ती ( पार्ट टाईम फलंदाज) शार्दूल ठाकूरची... आयपीएलमध्ये फॅफ ड्यू प्लेसिससह खोऱ्याने धावा करणारा विराट कोहली, भारतीयांना WTC Final मध्ये सापडलाच नाही. अशी अवस्था टीम इंडियाची झाली आहे... गोलंदाजीच्या बाबतीत चर्चा न केलेली बरी...


सामन्यानंतर रोहित शर्मा, राहुल द्रविड यांनी सरावासाठी पुरेसा वेळ न मिळाल्याची खंत व्यक्त केली. या सर्वांना एवढेच WTC Final महत्त्वाची वाटत होती, मग इंडियन प्रीमिअर लीगच्या शेवटच्या टप्प्यात खेळायचे नव्हते. पण, तसे करून कसे चालणार... आयपीएल फ्रँचायझीने बक्कळ पैस ओतून यांना दोन-अडीच महिन्यांसाठी खरेदी केलंय ना... त्या पैशावर पाणी कसं सोडता येईल? मग त्यासाठी आणखी एक WTC Final गमवावी लागली तरी चालेल... खेळाडूंच्या देशप्रेमावर शंका उपस्थित करायची नाही, परंतु त्यांच्या क्रिकेटप्रेमाबाबत ही शंका आहे... एकीकडे मिचेल स्टार्क आयपीएलच्या पैशांवर पाणी सोडून देशासाठी खेळण्याचा ठाम निर्धार करतो, तेच दुसरीकडे समोर महत्त्वाची स्पर्धा असतानाही IPL प्रती निष्ठा इमाने इतबारे निभावणारे आपले वाघ...


माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी तर थेट बीसीसीआयला अशा महत्त्वाच्या स्पर्धेपूर्वी आयपीएल असेल तर वेळापत्रकात बदल करण्याचा सल्लाच दिला. या WTC फायनलच्या आधी भारतीय खेळाडू दोन महिने आयपीएल खेळले. ही स्पर्धा संपल्यानंतर लगेचच भारतीय खेळाडू लंडनला रवाना झाले आणि एका आठवड्याच्या आत त्यांना कसोटी खेळण्यासाठी मैदानावर उतरावे लागले. खेळाडूंसाठी ते खूप कठीण गेले असावे. त्याचाही त्यांच्या कामगिरीवर परिणाम होणे स्वाभाविक आहे. नाणेफेक जिंकूनही प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी खेळपट्टी वाचण्यात चूक केली आणि ती महागात पडली. 


फलंदाजीतील आघाडीच्या फळीची फ्लॉप कामगिरी ही भारतीय संघाची सर्वात मोठी कमकुवत बाजू ठरली.  सलामीवीर शुबमन गिल (१३, १८), कर्णधार रोहित शर्मा (१५, ४३), विराट कोहली (१४, ४९ ) आणि चेतेश्वर पुजारा ( १४, २७) हे दोन्ही डावांत अपयशी ठरले. चुकीच्या फटक्यांनी यांचा घात केला. दोन्ही डावात अजिंक्य रहाणे (८९, ४६) एकटा लढताना दिसला.  त्यात भारतीय गोलंदाज ट्वेंटी-२० फॉरमॅटमधून बाहेरच आलेले दिसले नाहीत. त्यांनी ऑसी खेळाडूंना कमबॅक करण्याची संधी दिली. जगातील टॉप कसोटी गोलंदाज आर अश्विनला संघाबाहेर का बसवले हा प्रश्न पुढे चर्चेत राहिलच.. कारण ५ लेफ्टी फलंदाज प्रतिस्पर्धी घेऊन मैदानावर उतरले असताना अश्विन नसणे,हे समजण्या पलीकडे आहे.  


आता आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ आगामी वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत तरी संपेल अशी अपेक्षा... भारतीय खेळाडूंना ताजेतवाना होण्यासाठी आता १३ जुलैपर्यंत आरामच आराम आहे... 

Web Title:  Blog : Key reasons behind Team India's fiasco in Word Test Championship final against Australia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.