शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
2
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
3
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
4
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
5
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
6
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
7
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
8
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
9
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
10
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
11
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
12
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
13
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
14
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
15
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
16
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
17
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
18
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
19
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
Daily Top 2Weekly Top 5

तुमसरातील सोनी हत्याकांडाला वर्ष पूर्ण

By admin | Updated: February 26, 2015 00:22 IST

सराफा व्यापारी संजय सोनी तिहेरी हत्याकांड राज्यभरात गाजले होते. त्याला दि. २६ रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे.

तुमसर : सराफा व्यापारी संजय सोनी तिहेरी हत्याकांड राज्यभरात गाजले होते. त्याला दि. २६ रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. याप्रकरणात तुमसर पोलीसांनी ८०० पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले. या हत्याकांडातील सातही आरोपींना अजूनपर्यंत शिक्षा सुनावण्यात आली नाही. मुद्देमालासह २४ तासात आरोपींना पोलीसांनी अटक केली होती. या दरोडा प्रकरणात ३९ लाख रोख, ८ किलोग्रॅम सोने, चांदी असे २ कोटी ९ लाख किंमतीचा ऐवज हस्तगत केला होता.शहरातील रामकृष्ण नगरातील सोनी यांच्या घरी सात दरोडेखोरांनी दरोडा घातला होता. यात संजय सोनी (४७) यांचा तिरोड्याजवळ रात्री गळफास लावून खून केला. नंतर तुमसर येथील घरी पत्नी पूनम सोनी (४३) व मुलगा द्रुमील (११) यांची हत्या केली होती. तुमसर येथून ४ व नागपूरातून ३ आरोपींना २४ तासात पोलीसांनी अटक केली होती. हे तिहेरी हत्याकांड संपूर्ण राज्यात गाजले होते. माजी केंद्रीयमंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या प्रयत्नामुळे हा खटला फास्ट ट्रॅक कोर्ट (जलद) न्यायालयात सुरु झाला. तत्कालीन गृहमंत्री स्व.आर.आर. पाटील यांनी विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची शिफारस खटला चालविण्याकरिता केली होती. राज्य शासनाने अ‍ॅड.निकम यांची नियुक्ती केली आहे. आरोपींना अजूनपर्यंत शिक्षा न झाल्याने सराफा व्यापाऱ्यांत रोष व्याप्त आहे.आरोपींविरुद्ध भादंवि ३०२ खून करणे, ३९६ खुनासह दरोडा, ४४९ मृत्यूच्या शिक्षेचा गुन्हा करण्याकरिता गृहप्रवेश, १२० फौजदारी कट रचणे, २०१ पुराने नष्ट करणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपपत्रात ९९ साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात आलेल्या आहेत. येथे आरोपींच्या वकीलीसाठी वकीलांनी नकार दिला होता. शहरात महिला संघटनांनी मोर्चा काढून आरोपींना फाशीच्या शिक्षेची मागणी केली होती. मोर्च्यात विविध संघटनांचाही समावेश होता. मृतक संजय सोनी यांच्या देखणा बंगला अगदी ओसाड पडला आहे. आलीशान वास्तू मागील एक वर्षापासून कुलूपबंद आहे. संजय सोनी यांच्या कुटुंबातील एकमेव त्यांची मुलगी हिरल सोनी बचावली. हत्याकांडाच्या दिवशी ती मामाकडे अकोला येथे गेली होती. (तालुका प्रतिनिधी)रक्तदान शिबिर व कँडल मार्चसोनी हत्याकांडाला दि. २७ रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. सराफा संघ तुमसर व मोहाडी संघाच्या वतीने दि. २७ रोजी सकाळी १० ते दु. ४ विवेकानंद नगरातील पितृस्मृती भवनात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. संध्याकाळी ६.३० वा. कँडल मार्च काढण्यात येणार आहे. या कँडल मार्चला नागरीकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सराफा असोसिएशन, जेसीआय, लायंस क्लब, नगरपरिषदेने केले आहे. या हत्याकांडाची आठवणी अद्याप ताज्या आहेत. केवळ आठवणीने अंगाचा थरकाप उडतो. अशा भावना नागरीकांनी व्यक्त केल्या.