शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
4
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
5
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
6
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
7
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
8
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
9
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
10
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
11
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
13
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
14
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
15
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
16
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
17
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
18
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
19
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
20
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 

मित्राचा मॅसेज करु शकतो तुमची आर्थिक फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2019 12:23 AM

सध्या नागरिकांच्या मोबाईलवर एका संदेशाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. तुमच्या मित्राने तुमच्या खात्यात एक हजार रुपये जमा केले आहे. लिंकवर संपर्क केल्यास पैसे मिळतील असा तो संदेश आहे. मात्र या संदेशाने अनेकांची फसवणूक केली असून त्यामुळे नागरिकांनी सावध राहणे गरजेची आहे.

ठळक मुद्देनवा फंडा : लिंक शेअर करु नका, बँक डिटेल देऊ नका

संजय साठवणे।लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : सध्या नागरिकांच्या मोबाईलवर एका संदेशाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. तुमच्या मित्राने तुमच्या खात्यात एक हजार रुपये जमा केले आहे. लिंकवर संपर्क केल्यास पैसे मिळतील असा तो संदेश आहे. मात्र या संदेशाने अनेकांची फसवणूक केली असून त्यामुळे नागरिकांनी सावध राहणे गरजेची आहे. अशी कोणतीही लिंक शेअर करु नका आणि बँक डिटेलही देऊन नका.आॅनलाईन व्यवहारात आतापर्यंत शेकडो नागरिकांची फसवणुक झाली आहे. कोट्यवधीची लॉटरी लागल्याचा संदेश, एटीएम कार्ड बंद झाल्याचे सांगुन कार्ड व पीन नंबर विचारणे अशा प्रकारातून फसवणूक सुरु असतांना आता या सायबर गुन्हेगारांनी नवा फंडा शोधला आहे. तुमच्या खात्यात पैसे जमा झाल्याचा तो संदेश असतो. गत काही दिवसांपासून अनोळखी नंबरवरुन मोबाईलवर संदेश येत आहे. तुमच्यासाठी एक हजार रुपये मित्राने एफवायएनडीमध्ये जमा केले आहे. त्यासाठी कोड एक्सओएमएमएफएल वापरा. पाठविलेली लिंक डाऊनलोड करा. असा संदेश असतो. अनेकजण अशा प्रलोभनाला बळी पडतात आणि आपली बँक खात्याची माहिती देवुन बसतात. या माध्यमातून तुमचा संपूर्ण डेटा सायबर गुन्हेगारापर्यंत पोहोचतो. या माहितीच्या आधारावर तुमच्या बँक खात्याचा पैसा काढण्यापर्यंत मजल जावू शकतो. त्यामुळे असे संदेश नजरअंदाज करणे गरजेचे आहे.क्लीक केल्याचा परिणाममोबाईल येणाऱ्या संदेशाची लिंक क्लीक केल्यास अ‍ॅप्लीकेशन इंस्टॉल करण्यास सांगीतले जाते. नंतर परवानगी अलाऊ करण्यास सांगितले जाते ज्यामध्ये आपले संपर्क क्रमांक लोकेशन, फोटो स्टोरेज व अन्य माहिती या अ‍ॅप्लीकेशनच्या माध्यमातून डव्हलपरकडे सेव होते. त्या सर्व संपर्क क्रमांकावर हा संदेश जातो.रहा सावधआपल्या मोबाईलवर असे संदेश आले असतील तर या लिंक वर क्लीक करु नये. हा फिडींग संदेश आहे. क्लीक केल्यास आपल्या मोबाईलमधील माहिती सायबर गुन्हेगारापर्यंत जाऊ शकते. त्यातून आपली फसवणूक होऊ शकते. अनेकांच्या मोबाईलवर असे संदेश येत असून यासाठी सावध राहणे गरजेचे आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजी