शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
2
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
3
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
4
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
5
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
6
"ये तो होना ही था..." अरविंदर सिंग लवलींच्या राजीनाम्यानंतर भाजपा नेत्यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
7
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
8
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
9
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
10
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
11
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
12
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
13
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
14
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
15
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
16
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
17
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
18
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
19
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
20
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा

होय, अजूनही माणुसकी आहे जिवंत! रस्त्यावर पडलेले १३ हजार केले परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2020 6:29 PM

पृथ्वीराज मेश्राम सोमवारी सकाळी फिरायला गेले असताना त्यांना रस्त्याच्या कडेला पाकीट पडलेले दिसले. ते उघडून पाहिले असता त्यात बऱ्याचशा नोटा दिसल्या.

ठळक मुद्देगावात व परिसरात पृथ्वीराज मेश्राम यांच्यावर कौतुकाचा वर्षावसोशल मीडियाच्या आधारे घेतला शोध

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : लॉकडाऊनमुळे आर्थिक आपत्तीच्या संकटात सापडलेल्या स्थितीतही माणसामधील माणुसकी जिवंत आहे याचा प्रत्यय भंडारा जिल्ह्यात आला. नेहमीप्रमाणे गावाबाहेरील रस्त्याच्या कडेने पृथ्वीराज मेश्राम सोमवारी सकाळी फिरायला गेले असताना त्यांना रस्त्याच्या कडेला पाकीट पडलेले दिसले. ते उघडून पाहिले असता त्यात बऱ्याचशा नोटा दिसल्या. त्या परत केल्याच पाहिजेत या विचाराने गावात येऊन त्यांनी हे वृत्त अनेकांना सांगितले व मालकाचा शोध घेण्यासाठी विनंती केली.

मात्र त्या पाकिटात मालकाचा कुठलाच पत्ता नसल्याने मोठा प्रश्न निर्माण झाला. मेश्राम यांनी ते पाकीट स्वत:जवळच ठेवून घेतले. या विषयाची चर्चा गावात बरीच रंगली. त्यातच कुणीतरी हे वृत्त वॉटसअपवरही टाकले. ते मग गावोगावी फिरले आणि आश्चर्य, मंगळवारी सकाळी त्या पाकिटाच्या मालकाचा शोध लागला. ते त्याच गावात सुतारकाम करणाऱ्या थालीराम बावणे यांचे होते.

मालकाचा पत्ता कळताच मेश्राम गावातील काही व्यक्तींना घेऊन त्यांच्या घरी गेले व ते त्यांच्या स्वाधीन केले. यावेळी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मनोहर झलके, माजी उपसरपंच योगेश झलके ग्रामपंचायत सदस्य टिकेस्वर मेश्राम, तसेच तुळशीदास कठाणे उपस्थित होते. पाकिट बावणे यांचेच आहे याची खातरजमा करून घेत ते त्यांच्या स्वाधीन करण्यात आले. 

आपले हरवलेले पाकिट पाहताच बावणे सद्गदित झाले. हरवलेले १३ हजार परत मिळाले यावर बावणे यांचा विश्वासच बसत नव्हता. पृथ्वीराज मेश्राम यांचे आभार मानण्यासाठी त्यांच्याजवळील शब्द अपुरे पडत होते. ही घटना पंचक्रोशीत वाऱ्यासारखी पसरली तेव्हा मेश्राम यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत होते.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके