शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

बीडीओंसह कर्मचाऱ्यांची तुमसर पंचायत समिती कार्यालयाला दांडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 21:58 IST

तुमसर पंचायत समिती शुक्रवारी दिवसभर बेवारस होती. संपूर्ण दिवस विविध विभागातील अधिकारी आणि कर्मचारी कार्यालयात अनुपस्थित होते. विभागाचे गटविकास अधिकारी अनुपस्थित होते. शेकडो ग्रामस्थ कार्यालयीन कामाकरिता पं.स कार्यालयात आल्यावर त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले. दि. ३ नोव्हेंबर रोजी पं.स. मासिक सभेत सदर मुद्दा उपस्थित करणार असल्याचे पं.स. सदस्य हिरालाल नागपुरे उपस्थित करणार आहेत.

ठळक मुद्देमासिक सभेत मुद्दा गाजणार : चौकशी व कारवाईची मागणी, शेकडो ग्रामस्थांना फटका

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तुमसर पंचायत समिती शुक्रवारी दिवसभर बेवारस होती. संपूर्ण दिवस विविध विभागातील अधिकारी आणि कर्मचारी कार्यालयात अनुपस्थित होते. विभागाचे गटविकास अधिकारी अनुपस्थित होते. शेकडो ग्रामस्थ कार्यालयीन कामाकरिता पं.स कार्यालयात आल्यावर त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले. दि. ३ नोव्हेंबर रोजी पं.स. मासिक सभेत सदर मुद्दा उपस्थित करणार असल्याचे पं.स. सदस्य हिरालाल नागपुरे उपस्थित करणार आहेत.महिन्यातील दुसरा व चवथ्या शनिवार शासकीय सुटीचा दिवस होता. त्यामुळे शुक्रवारीच कार्यालयीन कामे करण्याचा नागरिकांचा भर असतो. पंचायत समिती संपूर्ण तालुक्यातील शासकीय योजनांची अंमलबजावणी करणारे कार्यालय आहे. शुक्रवारी गटविकास अधिकारी तथा इतर कर्मचाºयांनी सकाळी हजेरी लावल्यानंतर कार्यालयातून निघून गेले. त्यानंतर ते कार्यालयात परत आले नाहीत. यात बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, कृषी विभाग, ग्रामपंचायत विभाग या विभागात खुर्च्या रिकाम्या होत्या.या संदर्भात पं.स. सदस्य हिरालाल नागपुरे यांनी गटविकास अधिकारी मिलिंद बडगे यांचेशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधल्यावर त्यांनी मी सध्या बाहेर आहे. एवढे बोलून फोन बंद केला.याप्रकरणी दि. ३ नोव्हेंबर रोजी होणाºया पं.स. मासिक सभेत सदर प्रश्न उपस्थित करून संबंधितांवर कारवाईची मागणी पं.स. सदस्य हिरालाल नागपुरे, अरविंद राऊत, राजेंद्र ढबाले यांनी केली आहे.शुक्रवारी दिवसभर गटविकास अधिकारी तथा इतर विभागाचे विभाग प्रमुख व कर्मचारी पं.स. कार्यालयात अनुपस्थित होते. शेकडो ग्रामस्थांना त्याचा लटका बसला. कर्तव्यचुकार कर्मचाºयांच्या विरोधात मासिक सभेत आवाज उचलणार असून त्यांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्याची मागणी करणार आहे.-हिरालाल नागपुरे, पं.स. सदस्य, तुमसर.