शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

साकोलीत ग्रामसेवकांचे काम बंद आंदोलन

By admin | Updated: February 21, 2016 00:25 IST

ग्रामपंचायत भुयार पंचायत समिती पवनी येथील ग्रामविकास अधिकारी एस.व्ही. भटकर यांची तात्काळ बदली पवनी तालुक्याबाहेर करा...

अधिकाऱ्यांना निवेदन : अन्यथा सर्वांना निलंबित करासाकोली : ग्रामपंचायत भुयार पंचायत समिती पवनी येथील ग्रामविकास अधिकारी एस.व्ही. भटकर यांची तात्काळ बदली पवनी तालुक्याबाहेर करा अन्यथा जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवकांचे तात्काळ सामूहिक निलंबन करा या मागणीला घेवून साकोली तालुक्यातील सर्व ग्रामसेवकांचे पंचायत समिती कार्यालयासमोर काम बंद आंदोलन सुरू आहे.मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनानुार १२ ला ग्रामपंचायत कार्यालय भुयार येथील ग्रामविकास अधिकारी एस.व्ही. भटकर व सरपंच दुर्गा भोयर यांना ग्रामपंचायत सभागृहात मासिक सभेचे कामकाज पार पाडित असताना गावातील गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी सभेत हल्ला करून चपलांनी मारहाण केली. सदर घटनेची तक्रार सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांनी पोलीस स्टेशन पवनीला नोंदविली. त्यामुळे आपल्यावर कार्यवाही होईल या भितीने हल्लेखोरांनी खोटी अ‍ॅट्रासिटीची तक्रार सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांचेविरोधात नोंदविली. सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता ग्रामविकास अधिकारी भटकर यांची तात्काळ तालुक्याबाहेर बदली करण्यात आली. बदली संबंधी काही अडचणी असल्यास बदली सबंधित प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विभागीय आयुक्त नागपुर यांना पाठवून तात्काळ बदलीची कार्यवाही करावी.सदर प्रकरण अतिशय गंभीर असून ग्रामविकास अधिकारी एस.व्ही. भटकर यांची तालुक्याबाहेर बदली न केल्यास ग्रामविकास अधिकारी भटकर यांच्या जीवीताला हानी झाल्यास सर्वस्वी जबाबदारी जिल्हा परिषद प्रशासनाची राहील. त्याचप्रमाणे ग्रामविकास अधिकारी भटकर यांना दोन मुले असून एक मुलगा सेरेब्रल फालसी या आजाराने ग्रस्त आहे. अशा परिस्थितीत ग्रामविकास अधिकारी यांच्या जिवीतास धोका निर्माण झाल्यास त्यांचे कुटूंब उघड्यावर येईल. त्यामुळे शासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेवून मागणी पूर्ण करावी, अशी मागणी केली आहे.या कामबंद आंदोलनात महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघाचे अध्यक्ष रवि खोटेले, मानदअध्यक्ष भोजराम कोेचे, सचिव मिलिंद दरवरे, राज्य कार्यकारिणीचे विलास मुंडे, होमेश्वर लंजे, राजकुमार पटले, सरचिटणीस विनोद भेंडारकर, सोमेश्वर पडारे, माधव, गायकवाड, कांचन कुंभारे, हिरालाल खंडाईत, युवराज तलमले, शैलेश नंदेश्वर, प्रिती राऊत, भारती गेडाम, सुरेश राऊत यांच्यासह तालुक्यातील सर्व ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी उपस्थित आहेत. (तालुका प्रतिनिधी)