शहरं
Join us  
Trending Stories
1
लुक-आउट नोटीस, जामीन फेटाळला; अखेर केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा पोलिसांना शरण आला, काय घडले?
2
तामिळनाडू सरकारचे खातेवाटप ठरले, मुख्यमंत्री विजयने स्वतःकडे कोणते विभाग ठेवले? पाहा, यादी
3
“थलपती विजयशी तुलना करू नका”; पवन कल्याण, CM पदावरून साऊथ सुपरस्टारबाबत चाहत्यांमध्ये चर्चा
4
षटकारांची ‘बरसात’! IPL मध्ये अशी कामगिरी करणारा फिन ॲलन क्रिकेट विश्वातील पहिलाच फलंदाज
5
लहानग्या विराटला गंभीर आजार, DCM शिंदे मदतीला धावले; विनामूल्य शस्त्रक्रिया करून दिला दिलासा
6
KKR vs GT: मुंबईकर रघुवंशीचा ईडन गार्डन्सवर धमाका! गंभीर-उथप्पा यांच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
सुट्टीच्या आदल्या रात्री झोप का लागत नाही? काय आहे त्यामागचं लॉजिक? समजून घ्या!
8
“परिस्थिती बदलली नाही, तर दशकांच्या यश अन् मेहनतीवर पाणी फिरेल”; PM मोदींचे सूचक विधान
9
“धर्मेंद्र प्रधानांना बडतर्फ करा”; राहुल गांधींची मागणी, नीट पेपर लीक प्रकरण RSS-BJPशी जोडले
10
‘वॉरंट’ काढलं, पण DSP सिराजला 'अरेस्ट' करायला नाही जमलं; फिन ॲलनचा धुमाकूळ, शतक थोडक्यात हुकलं!
11
मातृत्वाला सलाम! स्वतः होरपळली, पण काळजाच्या तुकड्यांना वाचवलं; मन हेलावून टाकणारी घटना
12
ब्लूटूथ इयरबड्समुळे ब्रेन कॅन्सर होतो? तज्ज्ञांचा मोठा खुलासा, वापरताना 'अशी' घ्या काळजी
13
'माझ्याविषयी गैरसमज पसरवले...'; मराठा भवनासाठी जागा दिल्यानंतर मुंडेंचे विरोधकांना उत्तर
14
नोटांचे बंडल, दागिने, आलिशान फ्लॅट; इंजिनिअरकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड, ४ ठिकाणी धाड
15
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
16
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
17
बँकॉकमध्ये मोठा अपघात! मालगाडीची बसला जोरदार धडक; आगीत ८ जणांचा मृत्यू, २० जखमी
18
Sunil Narine : मिस्ट्री स्पिनरची कमाल! IPL मध्ये 'द्विशतक' साजरे करणारा ठरला पहिला परदेशी खेळाडू
19
“देशातील तरुणांचा मला अभिमान, माझ्या विधानाचा विपर्यास केला”; CJI सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण
20
NEET Exam Paper Leak: 'नीट’ पेपरफुटी प्रकरणात पुण्यातील प्राध्यापक मनीषा मांढरे अटकेत; सीबीआयकडून कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

सायबर गुन्ह्यांसंदर्भात महिलांनी सतर्क रहावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 06:00 IST

जिल्हा माहिती कार्यालय, महिला आर्थिक विकास महामंडळ आणि महाराष्ट्र सायबर पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सायबर सेफ वूमन व महिला सुरक्षा’ या विषयावर येथील सामाजिक न्याय भवनात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी माविमचे जिल्हा समन्वयक प्रदीप काठोळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून माहिती कार्यालयाचे सुनीलदत्त जांभुळे, रंजना खोब्रागडे, अरुणा बांते, पडोळे उपस्थित होते.

ठळक मुद्देमृणालिनी वंजारी : सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त ‘सायबर सेफ वूमन व महिला सुरक्षा’ कार्यशाळा

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : डिजिटल युगात इंटरनेटच्या माध्यमातून अनेक प्रकारचे गुन्हे घडत आहेत. विशेषत: महिला व बालकांविरूद्धच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. इंटरनेटच्या मदतीने महिलांचे लैगिंक शोषन, फसवणूक आदी गुन्हे घडत आहेत. त्यामुळे सायबर गुन्ह्यासंदर्भात महिलांनी अधिक सतर्क व जागरूक राहण्याची आवश्यकता आहे. अशी फसवणूक होत असल्यास तात्काळ पोलिसांची मदत घ्यावी, असे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक मृणालिनी वंजारी यांनी येथे केले.
जिल्हा माहिती कार्यालय, महिला आर्थिक विकास महामंडळ आणि महाराष्ट्र सायबर पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सायबर सेफ वूमन व महिला सुरक्षा’ या विषयावर येथील सामाजिक न्याय भवनात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी माविमचे जिल्हा समन्वयक प्रदीप काठोळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून माहिती कार्यालयाचे सुनीलदत्त जांभुळे, रंजना खोब्रागडे, अरुणा बांते, पडोळे उपस्थित होते. मृणालिनी वंजारी म्हणाल्या, हैदराबाद प्रकरण तसेच निर्भया हत्याकांडासारखे गुन्हे समाजात होत आहे. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. इंटरनेटचा सतत वापर केल्याने मुलांमध्ये हिंसक भावना निर्माण होत असून मुलांना अशा विकृत मानसिकतेपासून पालकांनी परावृत्त करावे तरच अशा घटना घडणार नाही. समाजाची मुली व महिलांकडे पाहण्याची मानसिकता बदलण्याची गरज आहे. योग्य व्यासपीठ न मिळाल्याने ग्रामीण भागातील मुली मागे राहतात. अशा मुलींना सायबर गुन्ह्यांना मोठ्या प्रमाणात सामोरे जावे लागते.
पालकांनी मुला-मुलींमध्ये भेदभाव करू नये, महिलांचा सन्मान करण्याचे संस्कार करावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी प्रदीप काठोळे यांनी महिलांनी कुटुंबात चांगले संस्कार करण्याचे आवाहन केले. आभार रंजना खोब्रागडे यांनी मानले.

पतीला परमेश्वर न समजता बेस्ट फ्रेंड समजा
आजच्या परिस्थितीत महिलांनी पती परमेश्वर न समजता बेस्ट फ्रेंड समजावे. त्यामुळे त्यांच्यात असलेले गैरसमज दूर होईल. कुटुंबात पुरूष, महिला समानतेचे संस्कार रूजवावे, महिलांनी स्वयंसंरक्षणासाठी महिलांनी अभ्यास करावा. अत्याचार प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करावी, निर्भिडपणा शासन अलर्ट आहे. तसेच खोटी तक्रार दिल्यास गुन्हा दाखल होवू शकतो. कायद्याचा गैरवापर टाळा, असे मृणालिनी वंजारी यांनी सांगितले.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइम