जवाहरनगर : ठाणा पेट्रोलपंप येथील रहिवासी एका ३८ वर्षीय विवाहितेने गाव तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. तिचा मृतदेह मंगळवाला सकाळी आढळून आला. जया नत्थू शेंदरे असे मृत महिलेचे नाव आहे. ती सोमवारला घरून निघून गेली होती. नत्थू शेंदरे यांची पत्नी घरून सोमवारला रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घरून निघून गेली. कुटुंबियांनी तिचा शोध घेतला. मात्र शोध लागला नाही. दरम्यान गाव तलावात मृतदेह तरंगत असल्याची माहिती मिळाली. सकाळी तलावात महिलेचा मृतदेह तरंगतांना आढळून आला. मासेमार बांधवांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला. घटनास्थळी नागरिकांची गर्दी जमली होती. पोलीस उपनिरीक्षक प्रीती आडे, विशाल पाटील यांनी पंचनामा केला. याप्रकरणी जवाहरनगर पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक प्रीती आडे या करीत आहेत. (वार्ताहर)
तलावात उडी घेऊन महिलेची आत्महत्या
By admin | Updated: July 13, 2016 01:34 IST