वीज कोसळली अन् क्षणात महिलेने गमावली दृष्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2025 08:48 IST2025-08-10T08:48:15+5:302025-08-10T08:48:28+5:30

खैरलांजी शेतशिवारात घडली भीषण दुर्घटना

Woman working in a field lost her sight due to lightning in Bhandara | वीज कोसळली अन् क्षणात महिलेने गमावली दृष्टी

वीज कोसळली अन् क्षणात महिलेने गमावली दृष्टी

धुसाळा कांद्री (भंडारा) : जवळच वीज कोसळल्याने शेतात काम करणाऱ्या महिलेची दृष्टी गेली. मोहाडी तालुक्यातील खैरलांजी येथे शनिवारी, दुपारी ३:३० वाजता ही धक्कादायक घटना घडली. प्रमिला मुकेश पुसाम (४८) असे या महिलेचे नाव आहे.

जनावरांना वैरण घेण्यासाठी प्रमिला पुसाम  ही महिला शेतात गेली होती. अचानकपणे तिच्या समोरच वीज कोसळली. त्यामुळे भीतीने तिने डोळे गच्च मिटून घेतले. मात्र, डोळे उघडल्यावर पुढील काहीच दिसेनासे झाले. डोळ्यांची उघडझाप करूनही काहीच दिसत नसल्याने ती घाबरून गेली. आपली दृष्टी गेल्याची जाणीव तिला झाली. यामुळे तिने मदतीसाठी आरडाओरड केला. शेजारच्या शेतावरील शेतकरी धावून आले. 
 

Web Title: Woman working in a field lost her sight due to lightning in Bhandara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात