शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

घानोडच्या समस्या प्राधान्याने सोडविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 06:00 IST

ज्यात असलेले लोकशाही आघाडी सरकार लोकांच्या विकासासाठी कटिबद्ध असून साकोली विधानसभेचा आमदार व विधानसभा अध्यक्ष म्हणून आपण या भागाच्या विकासाला प्राधान्य देणार आहोत. घानोड वासीयांनी व्यक्त केलेली सर्व विकासकामे प्राधान्याने करण्यात येतील, असे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केले.

ठळक मुद्देनाना पटोले : घानोड येथील जिल्हा परिषद शाळेतील वर्गखोलीचा लोकार्पण सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राज्यात असलेले लोकशाही आघाडी सरकार लोकांच्या विकासासाठी कटिबद्ध असून साकोली विधानसभेचा आमदार व विधानसभा अध्यक्ष म्हणून आपण या भागाच्या विकासाला प्राधान्य देणार आहोत. घानोड वासीयांनी व्यक्त केलेली सर्व विकासकामे प्राधान्याने करण्यात येतील, असे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केले.घानोड येथील शाळा प्रगती पथावर असून शिक्षणामुळेच मानवाचा विकास शक्य आहे. या शाळेने जास्तीत जास्त गुणवान विद्यार्थी घडवून आपला नावलौकिक जिल्हाभर करावा, असे ते म्हणाले.साकोली तालुक्यातील घानोड येथे सर्व शिक्षा अभियाना अंतर्गत बांधण्यात आलेल्या जिल्हा परिषद शाळा वर्गखोलीचे लोकार्पण विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच शाळेच्या स्नेहसंमेलनाचे उद्घााटन यावेळी करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते.यावेळी जिल्हा परिषद सदस्य नेपाल रंगारी, सरपंच रजनी डोंगरवार, सभापती उषा डोंगरवार, जिल्हा परिषद सदस्य होमराज कापगते, मुख्याध्यापक साखरे, उपसरपंच दिलीप ठाकरे व शिक्षक उपस्थित होते. यावेळी नाना पटोले म्हणाले की, लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत आणि त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार. धान उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी कटिबद्ध आहे. धानाला ७०० रुपये बोनस जाहीर केला आहे. शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळणार आहे, त्यासाठी ५१ हजार कोटी लागणार आहेत, सोबतच नियमितपणे कर्ज भरणाºयांना प्रोत्साहनपर लाभ मिळणार आहे.ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना करण्याचा ठराव अध्यक्ष या नात्याने विधानसभेत मांडला व तो मंजूर करून घेतला. समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जातीनिहाय जनगणना होणे आवश्यक असल्याचे पटोले म्हणाले. अधिकाराचा व पदाचा उपयोग जनतेला न्याय देण्यासाठी करणार आहे.प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक साखरे यांनी केले. समग्र शिक्षा अभियानात ही वर्ग खोली बांधण्यात आली आहे. या शाळेतून आतापर्यंत ३८३८ विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले आहे. शाळेस अ श्रेणी प्राप्त आहे. आयएसओ प्राप्त करण्याचे ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले. घानोड तलावाला भेट देऊन तो दुरुस्त करावा व पाणवठा बांधावा, रस्ते तयार करावेत, तुकडोजी महाराजांचा पुतळा उभारावा, अतिरिक्त दोन वर्ग खोल्या त्याचसोबत समाज मंदिर व सभामंडप बांधण्यात यावे अशी गावकºयांनी मागणी केली. या कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोले