लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : सर्वसामान्य जनतेच्या सुरेक्षेची जबाबदारी असणाऱ्या पोलिसांकडूनच अवैध धंदे करणाºया दलालाला पाठीशी घालण्याचे काम होत असल्याचा प्रकार साकोली तालुक्यात घडला. अवैध रेती तस्करी, मुरूम उत्खननासह जनावरांची तस्करी करणाºया वाहनांवर कारवाई न करता अशा अनेक प्रकरणांकडे साकोली पोलिसांकडून टाळाटाळ केली जात आहे.दहा दिवसापूर्वी असाच एक प्रकार तालुक्यात उघडकीस आला. त्याप्रकरणात पोलिसांसोबत एक दलाल सक्रीय असल्याचे उघड झाले होते. आता त्या दलालाचा शोध साकोली पोलीस घेणार काय, असा संतप्त सवाल नागरिकातून विचारला जात आहे.तालुक्यातून कत्तलीसाठी वाहने जातात. मात्र गुंडप्रवृत्तीच्या वाहन धारकांवर पोलिसांकडून कोणतीच कारवाई होत नाही. दलाल पोलिसांना माहिती देत असल्याने पोलिसांकडून अशी जनावरे भरलेली वाहने सोडून देण्यात येत आहेत. सर्वसामान्य कुटुंबातील दलाल महागड्या गाड्या, मोबाईल वापरतात. याची जनतेत चर्चा सुरु आहे. काही महिन्यापुर्वी एका दलालाच्या वाहनाला अपघात झाला असता ते प्रकरण पोलिसांकडून दाबण्यात आले होते. गोंडउमरी मार्गे जनावरे भरून जाणारा ट्रक येणार असल्याची माहिती मिळाली. मात्र त्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला असता त्याच्याच कारने शोध घेण्यात आला. मात्र जनावरांचा ट्रक आढळलाच नाही. अशा प्रकारे पोलीसांकडून वाहनांवर कारवाईस टाळाटाळ होत आहे.नागरिक म्हणतात, दलालाचा बंदोबस्त करासाकोली तालुक्यात ग्रामीण भागात दलालांची मोठी साखळी आहे. दिवसेंदिवस दलालांची संख्या वाढत असल्याने रात्री देवरी ते साकोली या महामार्गावरून जनावरांच्या ट्रकच्या मागेच दलाल असतात. हे दलाल पोलिसांसी मध्यस्थी करत पैशाचे आमिश दाखवत जनावरांची तस्करी करीत आहेत. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे.
‘त्या’ दलालाचा शोध साकोली पोलीस घेणार काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 05:01 IST
दहा दिवसापूर्वी असाच एक प्रकार तालुक्यात उघडकीस आला. त्याप्रकरणात पोलिसांसोबत एक दलाल सक्रीय असल्याचे उघड झाले होते. आता त्या दलालाचा शोध साकोली पोलीस घेणार काय, असा संतप्त सवाल नागरिकातून विचारला जात आहे. तालुक्यातून कत्तलीसाठी वाहने जातात. मात्र गुंडप्रवृत्तीच्या वाहन धारकांवर पोलिसांकडून कोणतीच कारवाई होत नाही.
‘त्या’ दलालाचा शोध साकोली पोलीस घेणार काय?
ठळक मुद्देप्रकरण रेतीच्या वसुलीचे । दलाल कमावित होता महिन्याला ५० हजार रूपये