शहरं
Join us  
Trending Stories
1
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
2
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
3
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
4
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
5
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
6
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
7
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
8
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
9
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
10
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
11
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
12
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
13
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
14
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
15
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
16
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
17
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
18
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
19
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
20
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
Daily Top 2Weekly Top 5

लाखांदूर तालुक्याला विधानसभेचे नेतृत्व मिळणार का?

By admin | Updated: September 27, 2014 01:18 IST

नाना पटोले यांचे विधानसभेचे नेतृत्व कधी कुणाच्या नशीबाचे दार खुले करण्यासाठी लोकसभेचे पायरी चढतील या प्रतीक्षेत सारेच असतांना.

लाखांदुर : नाना पटोले यांचे विधानसभेचे नेतृत्व कधी कुणाच्या नशीबाचे दार खुले करण्यासाठी लोकसभेचे पायरी चढतील या प्रतीक्षेत सारेच असतांना. पटोले तर खासदार बनले. मात्र, आमदारकीचे स्वप्नही तेवढेच खडतर बनले. या घाईगर्दीत लाखांदूर तालुक्याला पुन्हा एकदा पंचेवीस वर्षानंतर विधानसभेच्या नेतृत्वाची संधी मिळणार का ? म्हणून सारेच भाजपा नेते गुढघ्याला बाशींग बांधून आहेत.भाजप आमदार तथा खासदार नामदेवराव दिवठे, माजी आमदार हिरालाल भैया सारखे दिग्गज व तत्वनिष्ठ राजकारणी तथा समाजकारणी तालूक्याला लाभले. तेव्हापासून भाजपा व कांग्रेसच्या यूवा तरुण व मनापासून राजकीय पिठ नसलेल्या यूवकांनी भविष्यात आमदारकीचे स्वप्न बघून पक्ष शिस्तीचे पालन केले. यामध्ये माजी जि.प. अध्यक्ष अ‍ॅड. वसंता एंचिलवार, माजी जि.प. सदस्य वामन बोपचे यांनी तन-मन-धनाने पक्षाचे आदेश तथा पक्ष वाढीसाठी प्रयत्न केले. राजकारणात कधीतरी जनसेवा करण्यासाठी मोठी संधी मिळेल याच हेतुने राजकारणात संपूर्ण वेळ दिला. याच कालावधीत दयाराम कापगते यांना संधी मिळाली. अर्जुनी (मोर) व लाखांदुर विधानसभेचे नेतृत्व केले. त्यानंतर कॉंग्रेस पक्षात झंजावती यूवानेता म्हणूनी चारही तालूक्यात लोकप्रियतेचा झेंडा गाढून आमदार बनण्याचा ऐतिहासीक मान खा. नाना पटोले यांना मिळाला. जनता व नागरिक तथा शेतकऱ्यांचा हिताच्या मागण्या संदर्भात बगावत करीत पक्षत्याग करीत त्यांनी भाजपात प्रवेश केला. नाना पटोले हे एकदा खासदार बनले पाहिजेत म्हणून २०१३ च्या निवडणूकीत भाजपा कार्यकर्त्यांनी जिवाचे रान करुन पटोले यांना निवडून आणले. यामुळे आमदारकीचा मार्ग खुला झाला.सन २०१४ विधानसभेत आता आपली जागा पक्की म्हणून जनसपंर्क वाढवित असतांना. साकोली विधानसभेकरिता भाजपातून चाळीस पेक्षा जास्त संभाव्य उमेदवार रांगेत उभे झाले. २५ वर्षापासून आमदारकीला पोरका लाखांदुर तालूक्याचा ऐंचिलवार किंवा वामन बेदरे सारखे नेतृत्व मिळणार म्हणून सारेच मात्र खुश होते. तालुका भाजपा कार्यकर्त्यांची एकच मागणी पुढे येवू लागली. ऐंचिलवार किंवा वामन बेदरे. परंतु जर की हे दोन्ही नाव उमेदवारीतून काढले तर साकोली विधानसभेकरिता भाजपा गोटातून उभा राहिलेला तिसरा उमेदवार विजयाचे समिकरण पुर्ण करण्यास नापास झाल्याशिवाय राहणार नाही.राकाँ किंवा काँग्रेस साकोली विधानसभा कोणत्या पक्षाला जाणार हेही समीकरण चर्चेत आहे. नेहमी कांग्रेसकडे असणारी साकोली विधानसभा यंदा सारे समीकरण बदलवून टाकणारी ठरु शकते. खासदार पटोले यांनी उमेदवारीबद्दल मौन पाडले आहे. मात्र भाजपा-राकाँ-काँग्रेस गोटातून तर्क वितर्क जोडले जात आहे. जेष्ठ भाजपा कार्यकर्ते दादा टिचकुले यांना भाजपातून उमेदवारी मिळाली तर कांग्रेसचे जेष्ठ माजी आमदार सेवक वाघाये यांना उमेदवारी मिळु शकते. उलट जर का यूवा भाजपा नेते बाळा काशिवार यांना भाजपातून उमेदवारी मिळाली तर यूवक वर्गाचे चाहते तसेच तडफदार, सार्वजनिक हित जोपासणारे विकास पुरुष जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे यांना उमेदवारी राकांच्या गटातून मिळण्या संदर्भात चर्चा सुरु आहे.लाखांदुर तालुक्यात राकाँ व काँग्रेस तर्फे संभाव्य उमेदवार दिसून येत नाही. मात्र भाजपातून अ‍ॅड. वसंता ऐंचिलवार व वामन बेदरे नाव चर्चेत आहे. पक्षाची बांधीलकी, शिस्त, पक्षश्रेष्ठीचे निर्देश व भाजपाचे ध्येय धोरणे याची योग्य जान असल्याचे तसेच भाजपात मागून मिळत नाही. पक्षाप्रति निष्ठा बाळगणाऱ्यावर अन्याय होत नाही. असे म्हणत पक्षाच्या वरिष्ठांचा निर्णय मान्य करणार असल्याचे ऐंचिलवार व बेदरे यांनी सांगितले. मात्र तालूक्या बाहेरची उमेदवारी ही विजयाची समिकरणे बदलवू शकते. याच तीळमात्र शंका नाही. लाखांदुर तालुक्याला विधानसभेचे नेतृत्व मिळणार का? भाजप कार्यकर्त्यात तिव्र अपेक्षा वाढल्या आहेत. (तालुका प्रतिनिधी)