शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

अवैध दारूविक्रेत्यांना अभय कुणाचे?

By admin | Updated: January 10, 2015 22:50 IST

पवनी तालुक्यामध्ये ठिकठिकाणी दारू व सट्ट्याचे अवैध विक्रेते खुलेआम व्यवसाय करीत आहेत. या विक्रेत्यांना कमी वेळात जास्त पैसा कमविण्याचा हाच एक उपाय दिसतो आहे.

पालोरा (चौ.) : पवनी तालुक्यामध्ये ठिकठिकाणी दारू व सट्ट्याचे अवैध विक्रेते खुलेआम व्यवसाय करीत आहेत. या विक्रेत्यांना कमी वेळात जास्त पैसा कमविण्याचा हाच एक उपाय दिसतो आहे. कुणी चहाच्या केटलीतून तर कुणी 'एक पव्वे पे एक अंडा फ्री' म्हणून ग्राहकांना आकर्षित करीत आहेत. या अवैध व्यवसाईकावर आळा कोण घालणार, याला अभय कुणाचे आहे, असा प्रश्न जनतेला पडला आहे. पवनी तालुका विविध पर्यटनस्थळांनी नटलेला आहे. या तालुक्याची लोकसंख्या जवळपास २ लाख असून १५७ गावांचा समावेश आहे. या तालुक्या अंतर्गत दोन पोलीस ठाणे आहत. यात पवनी व अड्याळचा समावेश आहे. तालुक्यात एकूण १२ शासकीय परवाना असलेले दारू दुकाने आहेत.भुयार येथे जवळपास पाच दारू विक्रेते आहेत. कुणी पाणटपरीवरून दारू विक्री केल्या जात आहे. जिल्हा परिषद शाळेच्या आवार भिंतीला लागून तेलाच्या केटलीतून दारूचे पव्वे काढून विक्री करतानाचे चित्र पाहायला मिळत आहेत. आजगाव येथे जवळपास १५ अवैध व्यवसाय व सट्टा व्यवसाईक आहेत.बसस्थानकावर पानटपरीतून दारू विक्री केल्या जात आहे. आजगावपासून तीन कि़मी. अंतरावर खैरी गाव आहे. येथे शासकीय परवाना असलेली दारू दुकान आहे. ही दुकान गावापासून एक कि़मी. अंतरावर आहे. एकट्या आजगावात दररोज हजारो रूपयांची दारू विक्री केली जाते. तंटे गावातच मिटविण्यात यावे, म्हणून गावात तंटामुक्त समितीची स्थापना करण्यात येते. गावात कोणतीही अनुचित घटना घडू नये पोलीस पाटलाची नियुक्ती केल्या जाते. मात्र हे फक्त शोभेची वास्तू ठरत आहेत. अवैध दारू विक्रीमुळे अनेक कुटूंब रस्त्यावर आले आहेत. नवेगाव बाजार येथील लोकसंख्या ३०० आहे. मात्र दारू विक्रेते १० आहेत. येथे मोहफुलांची जास्त प्रमाणात दारू विक्री केली जाते. सायतानगर येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला लागूनच मोहफुलाची अवैध दारू विक्री केल्या जात असल्याचा प्रकार सुरू आहे. दारू बंदी करण्याकरीता महिला संघटनेनी पुढाकार घेतला होता. मात्र दोन दिवस बंद ठेवला जातो व तिसऱ्या दिवसी पुन्हा जैसे थे स्थिती पाहायला मिळत आहे. (वार्ताहर)