लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : काँग्रेसचे नेते आहेत तरी कुठे, त्यांचे खासदार करतात तरी काय, असा प्रश्न विचारत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी, काँग्रेसचे नेते एकमेकांचे तोंडही पाहात नाहीत, अशी टीका केली.
नगरपालिका निमित्ताने भाजपा नेते चंद्रशेखर निवडणुकीच्या बावनकुळे यांच्या पवनी, साकोली, तुमसर आणि भंडारा येथे सभा झाल्या. भंडारा येथे किसान चौकात झालेल्या सभेत त्यांनी काँग्रेसवर टीका केली. ते म्हणाले, भंडाऱ्याचे भाजपाचे खासदार आहेत कुठे, हे दिसत नाही. पक्षातील नेत्यांचे एकमेकांसोबत पटत नाही.
विजय वडेट्टीवर, नाना पटोले यांचे तोंड पाहात नाही. ते प्रदेशाध्यक्षांचे तोंड पाहत नाहीत. हा पक्ष कमजोर झाल्याने त्यामुळे मोठ्या प्रमाणावर काँग्रेसचे कार्यकर्ते पक्ष सोडत आहेत.
एक है तो सेफ है
एकत्र राहा, असा सल्ला देऊन बावनकुळे उपस्थिताना म्हणाले, एक है तो सेफ है. तुकड्यांमध्ये विभागू नका. तुमसरमधील सभेतही आमदार परिणय फुके यांनी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या 'बटेंगे तो कटेंगे' या विधानाचा पुनरूच्चार केला. आपल्या वक्तव्याचा अर्थ स्पष्ट करीत, मतांचे विभाजन होऊ देऊ नका, असेही नंतर आवाहन केले. नेत्यांच्या या विधानाची उपस्थितांमध्ये एकच चर्चा होती. स्थानिक पातळीवर राजकारण तापलेले दिसत आहेत.
Web Summary : Minister Bawankule questioned the whereabouts and actions of Congress leaders in Vidarbha, alleging internal conflict and resulting party weakness. He emphasized unity, echoing sentiments against division during local election rallies in Bhandara.
Web Summary : मंत्री बावनकुले ने विदर्भ में कांग्रेस नेताओं के ठिकाने और कार्यों पर सवाल उठाया, आंतरिक कलह और परिणामस्वरूप पार्टी की कमजोरी का आरोप लगाया। उन्होंने भंडारा में स्थानीय चुनाव रैलियों के दौरान एकता पर जोर दिया।