'मागेल त्याला सौर कृषिपंप' योजनेचे काय झाले? भंडारा जिल्ह्यातील १५०३ शेतकरी प्रतीक्षेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 18:20 IST2026-01-12T18:19:21+5:302026-01-12T18:20:35+5:30

Bhandara : शेतकऱ्यांच्या सिंचनाच्या दीर्घकाळ प्रलंबित समस्येला कायमस्वरूपी तोड देण्यासाठी तसेच दिवसा विश्वसनीय वीजपुरवठा सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या 'मागेल त्याला सौर कृषिपंप' योजनेने जिल्ह्यात गती घेतली आहे.

What happened to the 'Solar Agricultural Pump for Those Who Ask' scheme? 1503 farmers in Bhandara district are waiting | 'मागेल त्याला सौर कृषिपंप' योजनेचे काय झाले? भंडारा जिल्ह्यातील १५०३ शेतकरी प्रतीक्षेत

What happened to the 'Solar Agricultural Pump for Those Who Ask' scheme? 1503 farmers in Bhandara district are waiting

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा :
शेतकऱ्यांच्या सिंचनाच्या दीर्घकाळ प्रलंबित समस्येला कायमस्वरूपी तोड देण्यासाठी तसेच दिवसा विश्वसनीय वीजपुरवठा सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या 'मागेल त्याला सौर कृषिपंप' योजनेने जिल्ह्यात गती घेतली आहे. महावितरणकडून मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात आतापर्यंत २२७२ शेतकऱ्यांच्या शेतात सौर कृषिपंप प्रत्यक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत. मात्र, अद्यापही १५०३ शेतकरी सौर कृषिपंपासाठी प्रतीक्षेत आहेत.

प्रधानमंत्री कुसुम (कृषी ऊर्जा सुरक्षा आणि उत्थान महाभियान) योजनेच्या धर्तीवर राबवल्या जाणाऱ्या या महत्वाकांक्षी प्रकल्पामुळे हजारो शेतकरी आता शाश्वत सौर ऊर्जेवर अवलंबून राहून आपल्या पिकांना आवश्यक पाणीपुरवठा करू शकत आहेत. यापूर्वी रात्रीच्या वेळी सिंचनासाठी शेतात जाण्याचे कष्ट, वीजखंडित होण्याची भीती आणि वन्यप्राण्यांच्या हल्ल्याचे धोके यांपासून शेतकऱ्यांना मुक्ती मिळाली आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या भरीव अनुदानामुळे (९० ते ९५ टक्के) शेतकऱ्यांना केवळ ५ ते १० टक्के हिश्श्यात हा पंप मिळत आहे. यामुळे दिवसा सूर्यप्रकाशाच्या उपलब्धतेत सिंचन करणे सोपे झाले असून, पारंपरिक वीजेवरील अवलंबन, वाढते वीजबिल आणि अनियमित समस्या कायमच्या निकामी होणार आहेत. आणि हिवाळ्यातील शेतीसाठी हे पंप अत्यंत वीजपुरवठा यांसारख्या विशेषतः पावसाळ्यापूर्वी उपयुक्त ठरत आहेत. २,२७२ शेतकऱ्यांच्या शेतातच पंप बसविण्यात आले आहेत. उर्वरित सुमारे १,५०३ शेतकरी आता महिनोंमहिने वाट पाहत आहेत. याकडेही गांर्भीयाने लक्ष देणे गरजेचे आहे.

दीड हजार शेतकरी पैसे भरूनही प्रतीक्षेत

योजनेला शेतकऱ्यांनी उदंड प्रतिसाद दिला असला तरी, प्रशासकीय मंजुरी आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी यात मोठी दरी दिसून येत आहे. जिल्ह्यातील एकूण ५,०८० शेतकऱ्यांनी अर्ज सादर केले असून, त्यापैकी ४,२९५ अर्ज मंजूर झाले आहेत. यातील ३,७७५ शेतकऱ्यांनी आपला हिस्सा (५ ते १० टक्के रक्कम) महावितरणकडे जमा केली आहे.

Web Title : 'मागेल त्याला सौर कृषी पंप' योजना: भंडारा में 1503 किसान प्रतीक्षारत

Web Summary : भंडारा में सौर पंप योजना से 2272 किसानों को लाभ। 1503 किसान अभी भी पंपों का इंतजार कर रहे हैं, आवेदन और भुगतान के बावजूद। योजना विश्वसनीय सिंचाई का वादा करती है, किसानों को रात के जोखिमों और बिजली की समस्याओं से मुक्ति दिलाती है। प्रशासनिक देरी चिंता का कारण है।

Web Title : 'Magel Tyala Saur Krishi Pump' Scheme: 1503 Farmers Await in Bhandara

Web Summary : Bhandara's solar pump scheme progresses, benefiting 2272 farmers. However, 1503 farmers still await pumps despite application and payment. The scheme promises reliable irrigation, freeing farmers from nighttime risks and electricity woes. Administrative delays cause concern.