शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
2
वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला
3
"विचित्र बडबड करणं सॅम पित्रोदांचा स्वभाव, त्यांनी भारताचा अपमान केलाय"; रामदास आठवलेंची शाब्दिक चपराक
4
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
5
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
6
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
7
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
8
अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळणार की नाही? सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी देणार निकाल 
9
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
10
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
11
भारताचा नवा विक्रम; परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी वर्षभरात मायदेशी पाठवले 111 अब्ज डॉलर्स
12
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
13
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
14
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
15
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
16
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
17
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
18
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
19
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
20
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका

कोरफड शेतीतून शोधला शेतकऱ्याने प्रगतीचा मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2020 5:00 AM

गत तीन वर्षांपासून कोरफडची लागवड करीत आहे. सुरुवातीला त्याला अनेक अडचणीला सामोरे जावे लागले. मात्र तो खचला नाही. उलट कोरफडवर प्रक्रिया करुन गावातच लघु उद्योग उभारला. या लघुउद्योगाच्या माध्यमातून गावातील दहा ते पंधरा बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करुन दिला. विविध औषधीमध्ये कोरफडचा उपयोग केला जातो. आता तर प्रक्रिया उद्योगातही उतरला आहे.

ठळक मुद्देरोहणी येथील शेतकरी : प्रक्रीया लघु उद्योगातून ग्रामीण तरुणांना दिला हक्काचा रोजगार

दयाल भोवते।लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : परंपरागत धान शेतीला बगल देत एका शेतकºयाने औषधीयुक्त कोरफड लागवडीतून प्रगतीचा मार्ग शोधला. एवढेच नाही तर प्रक्रिया लघु उद्योगातून परिसरातील तरुणांना आत्मनिर्भर करण्याचे धाडस दाखवत त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन दिली. धान पट्ट्यात वेगळी वाट चोखाळणारा हा शेतकरी आहे, तालुक्यातील रोहणी येथील खेमराज हरिचंद्र भुते आज त्याच्या शेतातील उत्पादनांना चांगली मागणी आहे.कोरफड अर्थात अलोविरा ही वनस्पती औषधी गुणांनी युक्त आहे. या कोरफड वनस्पतीची लागवड खेमराजने आपल्या शेतात केली. खेमराज हा औषध निर्माण शास्त्रात पद्व्यूत्तर शिक्षण घेतलेला तरुण आहे. गोवातील एका नामवंत कंपनीत औषध निर्माता म्हणून नोकरीही केली. मात्र त्याच्यातील उद्योजक त्याला स्वस्थ बसू देत नव्हता. चांगल्या पगाराची नोकरी सोडून तो थेट रोहणी गावात पोहोचला. गावातील आपल्या शेतात कोरफड या औषधी वनस्पतीची लागवड केली.गत तीन वर्षांपासून कोरफडची लागवड करीत आहे. सुरुवातीला त्याला अनेक अडचणीला सामोरे जावे लागले. मात्र तो खचला नाही. उलट कोरफडवर प्रक्रिया करुन गावातच लघु उद्योग उभारला. या लघुउद्योगाच्या माध्यमातून गावातील दहा ते पंधरा बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करुन दिला. विविध औषधीमध्ये कोरफडचा उपयोग केला जातो. आता तर प्रक्रिया उद्योगातही उतरला आहे. त्याचा हा प्रयोग आता यशस्वी होत असून त्याच्या धाडसाचे कौतुक करण्यासाठी आणि कोरफड लागवडीची माहिती घेण्यासाठी अनेक शेतकरी त्याच्या शेतावर जातात. अनेकांनी आपल्या शेतात लागवड करण्याचा संकल्प केला आहे.देश-विदेशात उत्पादनाची मागणीऔषधी गुणांनी युक्त कोरफडला देश-विदेशात मोठी मागणी आहे. मात्र भंडारा जिल्ह्यातील धान पट्यातील शेतकऱ्यांना याबाबतची माहिती पुरेशी नव्हती. मात्र आता खेमराजने धाडस करुन प्रक्रिया उद्योग सुरु केला. सौंदर्य प्रसाधने व औषधी द्रव्यात त्याचा उपयोग केला जातो. घृतीका अ‍ॅग्रो नामक लघु उद्योगाच्या माध्यमातून आपले उत्पादन देशविदेशात पोहोचवत आहे. एका शेतकºयाने धाडस दाखवून आपल्या मायभूमीतील बेरोजगारांना रोजगाराची संधी दिली. जिल्ह्यात अनेक शेतकरी धानाचे उत्पन्न घेत शेती परवडत नसल्याची ओरड करीत आहेत. मात्र पीक पद्धतीत बदल केल्यास शेतीव्यवसाय आजही फायदेशिर ठरत आहे. यासाठी गरज आहे ती फक्त आधुनिक तंत्रज्ञानासह पीक पद्धतीत बदल करण्याची.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती