शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
4
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
5
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
6
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
7
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
9
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
10
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
11
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
12
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
13
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
14
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
15
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
16
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
17
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
18
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
19
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
20
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
Daily Top 2Weekly Top 5

वडद येथील घराघरांत शिरले पाणी

By admin | Updated: October 18, 2014 22:58 IST

विदर्भातील महत्वाकांक्षी राष्ट्रीय गोसीखुर्द धरणाचा जलस्तर वाढविण्याचे काम मागील दोन दिवसापासून सुरु करण्यात आला आहे. धरणाचा जलस्तर आज २४०.४०० मीटरवर पोहचला असून भंडारा

सावरगावच्या चहुबाजूने पाणी : गोसीखुर्दचा जलस्तर २४०.४०० मीटर वाढलागोसेबुज : विदर्भातील महत्वाकांक्षी राष्ट्रीय गोसीखुर्द धरणाचा जलस्तर वाढविण्याचे काम मागील दोन दिवसापासून सुरु करण्यात आला आहे. धरणाचा जलस्तर आज २४०.४०० मीटरवर पोहचला असून भंडारा व नागपूर जिल्ह्यातील अनेक गावात पाणी शिरून शेकडो एकर शेती पाण्याखाली आली आहे. वडदच्या अनेक घरात पाणी शिरले आहे. सावरगावला जाणारा एक मात्र रस्ताही बुडाल्यामुळे हे गाव पाण्याने वेढले आहे. पाथरीचा मुख्य रस्ता बुडणार असून हे गावही पाण्याने वेढणार आहे.गोसीखुर्द धरणाचा जलस्तर वाढविण्याचे काम मागील दीड महिन्यापासून सुरु आहे. पण धरणाचा जलस्तर २४० मीटर होताच बुडीत क्षेत्रातील अनेक गावात पाणी शिरणे सुरु झाले होते. एक एक करीत मोठ्या संख्येने घरे बुडत होती. दिवाळी सण, धान निसवण्याची आणि जलस्तर वाढविण्याची वेळ एकच आल्यामुळे स्थलांतराकरिता प्रकल्पग्रस्तांना अडचणी येत आहेत. त्यामुळे जलस्तर वाढविण्याला स्थगिती देण्याची मागणी केली. १५ आॅक्टोबरपर्यंत जलस्तर २४०.१०० मीटरवर स्थिर ठेवण्यात आले.१६ आॅक्टोबरपासून २४०.१०० मिटर पासून जलस्तर वाढविण्याचे काम पुन्हा सुरु करण्यात आले आहे. आज जलस्तर २४०.४०० मिटर पोहचताच दोन्ही जिल्ह्यातील बुडीत क्षेत्रातील अनेक गावातील घरामध्ये पाणी शिरून शेकडो एकर शेती पाण्याखाली आली आहे. गोसीखुर्द धरणाचा जलस्तर वाढविण्यापूर्वी सरकारी अधिकाऱ्यांनी वडद गावच्या खालच्या बाजूला ८.१० घरात पाणी शिरण्याची शक्या असल्याने त्यांना स्थानांतरण करण्याचे निर्देश दिले होते. परंतु, प्रत्यक्षात, जलस्तर वाढल्यामुळे काहीही ध्यानी मनी नसताना दुसऱ्याच भागातील ढिवर समाजातील वॉर्डातील ८.१० घराजवळ पाणी शिरून त्यांचा जाण्यायेण्याचा मार्ग बंद झाला आहे. प्रशासकीय अधिकारी बुडीत क्षेत्रातील गावातील धरणातील पाण्याची पातळी घेण्याचे अंदाज चुकत असल्यामुळे गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीने बुडीत क्षेत्रातील प्रत्येक गावाची धरणाची पातळी तपासण्याची मागणी केली आहे. (वार्ताहर)