चुलबंद क्षेत्रात नदी-नाल्यांना आले पाणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 05:00 AM2020-06-22T05:00:00+5:302020-06-22T05:00:26+5:30

गत चार ते पाच वर्षाचा परिस्थती पाहता जुलै महिन्याशिवाय नदीनाल्यांना पाणीच दिसत नव्हते. नदी काठावरील गावांना पिण्याचे पाण्याची अडचण जाणवत होती. मात्र या वर्षाला वरूण राजा मेहरबान झाल्याने अगदी जून महिन्यातच नदी-नाल्यांना प्रवाह मिळाल्याने भूजल पातळी वाढलेली आहे. या भूजल पातळीमुळे बोरवेल्स, विहिर व फिल्टर यांना पाणी मिळून रोवणीसाठी शेतकरी पुढे सरसावलेला आहे.

Water came to rivers and streams in Chulband area! | चुलबंद क्षेत्रात नदी-नाल्यांना आले पाणी!

चुलबंद क्षेत्रात नदी-नाल्यांना आले पाणी!

Next
ठळक मुद्देरोवणीला होणार मदत : बोरवेल, विहिरींची भूजल पातळी वाढणार

लोकमत न्यूज नेटवर्क
पालांदूर : रोहिणी व मृगधारा मुसळधार बसल्याने लाखनी तालुक्यातील पालांदूर परिसरातील चुलबंद खोº्यातील नदी-नाल्यांना प्रवाह मिळालेला आहे.
अनेक वर्षांनंतर जून महिन्यात नदी-नाल्यांना धार मिळत पाणी प्रवाहित झाले आहे. यामुळे चुलबंद खोऱ्यातील शेतीला मोठा लाभ मिळाला असून रोवणीला गती मिळणे आता सहज शक्य झाले आहे. गत चार ते पाच वर्षाचा परिस्थती पाहता जुलै महिन्याशिवाय नदीनाल्यांना पाणीच दिसत नव्हते. नदी काठावरील गावांना पिण्याचे पाण्याची अडचण जाणवत होती. मात्र या वर्षाला वरूण राजा मेहरबान झाल्याने अगदी जून महिन्यातच नदी-नाल्यांना प्रवाह मिळाल्याने भूजल पातळी वाढलेली आहे. या भूजल पातळीमुळे बोरवेल्स, विहिर व फिल्टर यांना पाणी मिळून रोवणीसाठी शेतकरी पुढे सरसावलेला आहे.
चुलबंद खोऱ्यात वर्षभराची शेती केली जाते. यामुळे भूजल पातळी खूप महत्त्वाची आहे. मे महिन्यामध्ये भूजल पातळी खोलात जाऊन काही विहिरी, फिल्टर प्रभावित होत पाणी बंद होत असे. शेतकरी नदी-नाल्यांना पाणी येण्याची प्रतीक्षा करीत असतात. ही प्रतीक्षा संपली असून लवकरच रोवणीचा हंगाम गतीत यायला मोठी मदत होईल.
पशुपालकांना पाण्याची नितांत आवश्यकता असून या पाण्यावरच त्यांना पशुधन पाळणे सुलभ होते. चुलबंद खोऱ्यातील बऱ्याच गावात पशुधन मोठ्या प्रमाणात पाळले जाते. शेतकऱ्यांना पशुधनाची मोठी मदत मिळत असून या पशुधनावरच शेती व स्वत:चा उदरनिर्वाह अवलंबून आहे. पहाटेपासून शेतकरी नदी, नाल्याच्या या पाण्यात आंघोळीसाठी व पाणी पाहण्याकरिता पशुधन आण्ून शेतकरी आपली दिनचर्या आरंभ करतो आहे.

Web Title: Water came to rivers and streams in Chulband area!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.