शहरं
Join us  
Trending Stories
1
लुक-आउट नोटीस, जामीन फेटाळला; अखेर केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा पोलिसांना शरण आला, काय घडले?
2
IPL 2026 Playoffs Race : स्क्रिप्ट भारी की, मॅच? १६ गुण कमावणाऱ्यांसाठीही पोटात गोळा आणणारा ट्विस्ट
3
तामिळनाडू सरकारचे खातेवाटप ठरले, मुख्यमंत्री विजयने स्वतःकडे कोणते विभाग ठेवले? पाहा, यादी
4
IPL कॅप्टन्सीत गिलचा मोठा पराक्रम! ५०० धावांचा पल्ला गाठत विराट-सचिनच्या विक्रमाशी बरोबरी
5
“थलपती विजयशी तुलना करू नका”; पवन कल्याण, CM पदावरून साऊथ सुपरस्टारबाबत चाहत्यांमध्ये चर्चा
6
IPL 2026 : गिलच्या विकेटसह नरेननं फिरवली मॅच! GT चा विजय रथ रोखत KKR नं मारली बाजी
7
षटकारांची ‘बरसात’! IPL मध्ये अशी कामगिरी करणारा फिन ॲलन क्रिकेट विश्वातील पहिलाच फलंदाज
8
लहानग्या विराटला गंभीर आजार, DCM शिंदे मदतीला धावले; विनामूल्य शस्त्रक्रिया करून दिला दिलासा
9
KKR vs GT: मुंबईकर रघुवंशीचा ईडन गार्डन्सवर धमाका! गंभीर-उथप्पा यांच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
सुट्टीच्या आदल्या रात्री झोप का लागत नाही? काय आहे त्यामागचं लॉजिक? समजून घ्या!
11
“परिस्थिती बदलली नाही, तर दशकांच्या यश अन् मेहनतीवर पाणी फिरेल”; PM मोदींचे सूचक विधान
12
“धर्मेंद्र प्रधानांना बडतर्फ करा”; राहुल गांधींची मागणी, नीट पेपर लीक प्रकरण RSS-BJPशी जोडले
13
‘वॉरंट’ काढलं, पण DSP सिराजला 'अरेस्ट' करायला नाही जमलं; फिन ॲलनचा धुमाकूळ, शतक थोडक्यात हुकलं!
14
मातृत्वाला सलाम! स्वतः होरपळली, पण काळजाच्या तुकड्यांना वाचवलं; मन हेलावून टाकणारी घटना
15
ब्लूटूथ इयरबड्समुळे ब्रेन कॅन्सर होतो? तज्ज्ञांचा मोठा खुलासा, वापरताना 'अशी' घ्या काळजी
16
'माझ्याविषयी गैरसमज पसरवले...'; मराठा भवनासाठी जागा दिल्यानंतर मुंडेंचे विरोधकांना उत्तर
17
नोटांचे बंडल, दागिने, आलिशान फ्लॅट; इंजिनिअरकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड, ४ ठिकाणी धाड
18
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
19
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
20
बँकॉकमध्ये मोठा अपघात! मालगाडीची बसला जोरदार धडक; आगीत ८ जणांचा मृत्यू, २० जखमी
Daily Top 2Weekly Top 5

गोदाम, बारदान्याअभावी खरेदी ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 05:00 IST

लाखनी येथील धान खरेदी केंद्रावरील खरेदी विक्री संस्था गोदामात सहा हजार ७४३ क्विंटल धान जमा झाला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गोदामात नऊ हजार ८३६ क्विंटल व निर्धनराव वाघाये पाटील बासमती राईस मिलच्या गोदामात एक हजार ७३६ क्विंटल धान खरेदी करून जमा आहे. लाखनी व परिसरातील ५६९ शेतकऱ्यांचा १८ हजार ३१६ क्विंटल धान खरेदी करण्यात आला आहे. सालेभाटा येथे विविध कार्यकारी संस्थांचे गोदामात एक हजार ३५६ क्विंटल धान खरेदी केली आहे.

ठळक मुद्देविक्रीअभावी शेतकरी त्रस्त : लाखनी येथील खरेदी विक्री संस्थेने केले ७० हजार क्विंटल धान खरेदी

चंदन मोटघरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखनी : येथील सहकारी शेतकी खरेदी विक्री संस्थेद्वारे खरीप धानाची खरेदी मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. मात्र सध्यस्थितीत गोदाम व बारदान्याअभावी आधारभूत धान खरेदी केंद्रावरील धान खरेदी ठप्प झाली आहे. अंदाजे ३० ते ४० हजार क्विंटल धान खरेदी केंद्राच्या बाहेर खरेदीविना पडून आहे. खरेदी विक्री संस्थेद्वारे २७ डिसेंबर अखेरपर्यंत ७० हजार ४५२ क्विंटल धान खरेदी करण्यात आली आहे.
लाखनी येथील धान खरेदी केंद्रावरील खरेदी विक्री संस्था गोदामात सहा हजार ७४३ क्विंटल धान जमा झाला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गोदामात नऊ हजार ८३६ क्विंटल व निर्धनराव वाघाये पाटील बासमती राईस मिलच्या गोदामात एक हजार ७३६ क्विंटल धान खरेदी करून जमा आहे. लाखनी व परिसरातील ५६९ शेतकऱ्यांचा १८ हजार ३१६ क्विंटल धान खरेदी करण्यात आला आहे. सालेभाटा येथे विविध कार्यकारी संस्थांचे गोदामात एक हजार ३५६ क्विंटल धान खरेदी केली आहे.
गोंडसावरी येथील सोसायटीच्या गोदामात एक हजार ४३० क्विंटल, राजेगाव येथील सोसायटीच्या गोदामात दोन हजार चार क्विंटल, सुशील डोंगरवार यांच्या बोरगावच्या गोदामात सहा हजार ८१३ क्विंटल, पिंडकेपार येथील सोसायटी गोदामात पाच हजार २३८ क्विंटल, एकोडी परिसरातील ७४९ शेतकऱ्यांकडून १४ हजार १०१ क्ंिवटल धान खरेदी केला आहे.
जेवनाळा खरेदी केंद्रामध्ये कनेरी येथे एक हजार ४१३ क्विंटल, गुरठा गोदामात एक हजार ५५७ क्विंटल, गोंडेगाव गोदामात एक हजार ४२९ क्विंटल असा एकूण १७४ शेतकºयांकडून खरेदी करण्यात आला आहे.
परसोडी खरेदी केंद्रावर बाबुराव भाजीपाले यांच्या गोदामात दहा हजार ८९३ क्विंटल, ताराचंद भाजीपाले यांचे उमरी गोदामात आठ हजार २२४ क्विंटल, उमरी येथे भाष्कर कापगते यांच्या गोदामात एक हजार ५०७ क्विंटल असे एकूण ७०७ शेतकºयांकडून २० हजार ६२६ क्विंटल धान खरेदी करण्यात आली आहे. सातलवाडा खरेदी केंद्रावर लोकचंद राऊत यांच्या गोदामात आठ हजार २१७ क्विंटल धान खरेदी करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यात लाखनी येथील साकोली तालुका सहकारी शेतकरी खरेदी विक्री समितीद्वारे धान खरेदती द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. गोदामाची असलेली कमतरता यामुळे धान खरेदी थांबवावी लागली आहे. मार्केटिंग फेडरेशनने मालाची उचल केल्यानंतर धानाची खरेदी शक्य होणार आहे.
गोदामाची संख्या वाढविण्यावर भर दिला जात असल्याचे खरेदी विक्री संघाचे सभापती घनश्याम पाटील खेडीकर यांनी सांगितले. गोदामाबाहेर असलेला शेतकऱ्याचा धान अवकाळी पावसाने भीजला आहे. धानाला सरकारने बोनस दिल्याने धान उत्पादक शेतकºयांचा आधारभूत खरेदी केंद्रावर विक्रीकरिता कल वाढला आहे.

टॅग्स :agricultureशेती