शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 1 मे रोजी अयोध्या दौऱ्यावर, रामललांचं दंर्शन, हनुमानगढी मंदिरात आरती अन्...; असा असेल संपूर्ण कार्यक्रम!
2
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
3
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
4
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
5
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
6
'नरेंद्र मोदी मोठ्या मनाचा नेता, एक मेसेज पाठवला अन् काम झालं', काँग्रेसच्या माजी नेत्यानं सांगितला किस्सा
7
“भटकती आत्मा तर नरेंद्र मोदीच, प्रधानमंत्री कमी अन् प्रचारमंत्रीच जास्त”; नाना पटोलेंची टीका
8
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
9
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
10
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
11
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर पण बाळासह आईचा मृत्यू
12
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
13
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
14
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
15
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
16
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
17
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
18
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
19
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
20
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा

दहा हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 12:55 AM

सातत्याने दुष्काळाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने घोषित केलेल्या कर्जमाफी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील १० हजार ३२८ शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. आता १६ वी ग्रीनलिस्ट प्रसिद्ध होणार असून त्यानंतर या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्दे१६ वी ग्रीन लिस्टयेणार : दोन वर्षात भंडारा जिल्ह्यातील ७९ हजार १२३ शेतकऱ्यांना लाभ

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : सातत्याने दुष्काळाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने घोषित केलेल्या कर्जमाफी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील १० हजार ३२८ शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. आता १६ वी ग्रीनलिस्ट प्रसिद्ध होणार असून त्यानंतर या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. दोन वर्षात या योजनेंतर्गत जिल्ह्यातील ८९ हजार ६२६ कर्जदार शेतकऱ्यांपैकी ७९ हजार १२३ शेतकºयांना लाभ मिळाला आहे.नैसर्गिक संकटातून बाहेर काढण्यासाठी शासनाने २०१७ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफीची घोषणा केली होती. २८ जून २०१७ रोजी याबाबतचा अध्यादेश जारी करण्यात आला.कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांकडून आॅनलाईन अर्ज भरुन घेण्यात आले. जिल्ह्यातील ८९ हजार ६२६ शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी आॅनलाईन अर्ज सादर केले. राज्य सरकारने आतापर्यंत १५ ग्रीनलिस्ट जारी केल्या असून त्यानुसार जिल्ह्यातील ७९ हजार ३२८ शेतकऱ्यांना २२१ कोटी ६२ लाख रुपयांची कर्जमाफी देण्यात आली.थकीत शेतकऱ्यांमध्ये जिल्हा बँकेच्या २४ हजार १०२ शेतकऱ्यांना ९४ कोटी ९६ लाख, राष्ट्रीयकृत बँकाच्या ५४५३ शेतकऱ्यांना २७ कोटी ७१ लाख आणि ग्रामीण बँकेच्या १५८५ शेतकºयांना ८ कोटी ४५ लाख रुपयांची अशी ३१ हजार १४० शेतकऱ्यांना १३० कोटी ९२ लाख रुपयांची कर्जमाफी देण्यात आली आहे. तर प्रोत्साहनपर लाभ देण्यात आलेल्यांमध्ये जिल्हा बँकेचे ४१ हजार ७९० शेतकऱ्यांना ६३ कोटी ६४ लाख राष्ट्रीयकृत बँकेच्या २९३३ शेतकऱ्यांना ७ कोटी २० लाख, ग्रामीण बँकेच्या २०५९ शेतकऱ्यांना ३ कोटी ६६ लाख असे ४६ हजार ७९२ शेतकऱ्यांना ७४ कोटी ५ लाख रुपयांचा लाभ देण्यात आला आहे.एकरकमी योजनेअंतर्गत जिल्हा बँकेच्या ६४४ शेतकऱ्यांना ८ कोटी २ हजार, राष्ट्रीयकृत बँकेच्या ५१८ शेतकऱ्यांना ५ कोटी ११ लाख आणि याशिवाय ग्रामीण बँकेच्या २१४ शेतकऱ्यांना १ कोटी ६४ लाख असे १३७६ शेतकऱ्यांना १४ कोटी ७७ लाख रुपयांचा लाभ देण्यात आलेला आहे.एकरकमी कर्ज भरणाऱ्या थकीत शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची ही मोठी संधी आहे. नवीन आदेशानुसार ३१ आॅक्टोंबरपर्यंत अंतीम मुदत वाढविण्यात आली आहे. कर्जमाफी आणि पीक कर्जाबाबत असलेल्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी तालुकास्तरावर समित्या गठीत करण्यात आल्या आहे.- मनोज देशकरजिल्हा उपनिबंधक, भंडारानव्या आदेशाने व्याप्ती वाढलीकर्जमाफी योजनेत सुरुवातीला १ एप्रिल २००९ ते ३० जून २०१७ पर्यंतच्या थकीत आणि नियमित कर्ज भरणाऱ्या अशा दोन श्रेणी शेतकऱ्यांना लाभ दिला जाणार होता. यात थकीत कर्जदारांना संपूर्ण कर्जमाफी आणि नियमित कर्ज भरणाऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यात येत होता. मात्र गत वर्षी यात नविन अध्यादेश काढण्यात आला. १ एप्रिल २००२ ते ३१ मार्च २००९ पर्यंतच्या शेतकऱ्यांना या योजनेत समाविष्ट करण्यात आला. योजनेची व्याप्ती वाढविल्याने योजनेच्या लाभ घेणाऱ्यांच्या तक्रारीतही वाढ झाली होती. भंडारा जिल्ह्यात थकीत कर्जदारांपेक्षा नियमित कर्ज परतफेड करणाऱ्यांना या योजनेचा अधिक लाभ मिळाला. जून अखेरपर्यंत ३१ हजार १४० थकीत शेतकऱ्यांना लाभ मिळाला असून त्यांना १३० कोटी ९२ लाख रुपयांची कर्जमाफी देण्यात आली. तर दुसरीकडे नियमित कर्ज भरणाऱ्या ४६ हजार ७८२ शेतकऱ्यांना ७४ कोटी ५ लाख रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्यात आले.

टॅग्स :Crop Loanपीक कर्ज