शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

वैनगंगेच्या पुराचा दरवर्षी ८३ गावांना बसतो फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:40 IST

भंडारा जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगेचे विशाल पात्र आहे. वैनगंगेच्या तीरावर ९९ गावे वसली आहे. त्यापैकी ८३ गावांना पुराचा फटका बसतो. ...

भंडारा जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगेचे विशाल पात्र आहे. वैनगंगेच्या तीरावर ९९ गावे वसली आहे. त्यापैकी ८३ गावांना पुराचा फटका बसतो. त्यात भंडारा तालुक्यातील २२, मोहाडी १२, तुमसर १५, पवनी ३३ आणि लाखांदूर तालुक्यातील नऊ गावांचा समावेश आहे. गोसेखुर्द येथे धरण झाल्यापासून पुराची तीव्रता वाढली आहे. प्रकल्पातून अतिरिक्त झालेले पाणी विसर्ग केल्यानंतर धरणाखालील गावात पूरस्थिती निर्माण होते. तर पाणलोट क्षेत्रात पुरेसे पाणी विसर्ग झाले नाही की बॅक वॉटर अनेक गावांमध्ये शिरते. भंडारा तालुक्यातील अर्जूनी, कोरंभी, पिंडकेपार, सुरेवाडा, मोहाडी तालुक्यातील मुंढरी बुज., ढिवरवाडा, घाटकुरोडा. तुमसर तालुक्यातील परसवाडा, तामसवाडी. पवनी तालुक्यातील सावरगाव, पवना खुर्द, जुनोना या गावांचा संपर्क तुटतो. विशेष म्हणजे मध्यप्रदेशातील संजय सरोवर आणि गोंदिया जिल्ह्यातील कालीसराट आणि पुजारीटोला प्रकल्पातील पाण्याचा विसर्गही या गावांसाठी धोकादायक असतो.

बॉक्स

असा बसला आतापर्यंत महापुराचा फटका

दरवर्षी पुराचा फटका बसत असला तरी गत २० वर्षांत चार वेळा नदीतीरावरील नागरिकांना महापुराचा फटका बसला आहे. १४ ते १७ सप्टेंबर २००५ मध्ये वैनगंगेला महापूर आला होता. त्यात चार हजार लोक पूरबाधित झाले होते. ८ सप्टेंबर २०१९ रोजी संजय सरोवरातून पाणी सोडण्यात आल्याने भंडारा शहरात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. शहरातील विविध भागांत पाणी शिरले होते. गतवर्षी ३० ऑगस्ट ते १ सप्टेंबर या काळात महापूर आला. संजय सरोवरातून पाणी सोडल्याने पूरस्थिती निर्माण झाली. नागरिकांच्या मदतीसाठी एनडीआरफच्या तीन चमूंना, एसडीआरएफच्या तीन चमूंना पाचारण करण्यात आले होते. ४४ हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले होते. चौघांचा महापुरात मृत्यू झाला तर शेकडो हेक्टर जमीन नष्ट झाली होती.