शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी यांचे वाराणसीच्या लोकांसाठी मतदानाच्या आधी खास पत्र, दिला महत्त्वाचा संदेश
2
थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या; रोहित पवारांचा फडणवीस, अजितदादांवर हल्लाबोल
3
केदारनाथ मध्ये मोठा हेलिकॉप्टर अपघात टळला, चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्रवाशांचे प्राण 
4
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
5
शिवसेना-भाजपात वादाची ठिणगी; "आनंदराव अडसूळांनी नको त्या विषयात हात घालू नये, अन्यथा..."
6
राज्यात दुष्काळामुळे स्थिती गंभीर: शरद पवारांनी राज्य सरकारकडे केल्या ७ महत्त्वाच्या मागण्या!
7
पुणे पोर्शे कार अपघात: फडणवीसांनी विरोधकांना सुनावले, “प्रत्येक गोष्टीत राजकारण योग्य नाही”
8
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
9
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
10
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
11
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी
12
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."
13
हातातील बांगड्यांनी उलगडलं गर्भवती युवतीच्या हत्येचं रहस्य; पतीनं रचला होता बनाव
14
चालताना नेमकं काय लक्षात ठेवायचं... वेळ, पावलं की अंतर?; वजन लवकर होईल कमी
15
लैला खान हत्या प्रकरणात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, १३ वर्षांनी अभिनेत्रीला मिळाला न्याय
16
Suresh Raina ने पाकिस्तानी पत्रकाराला झापले, शाहिद आफ्रिदीवरून करत होता ट्रोल 
17
१ वर ३ फ्री शेअर देतेय ही एनर्जी कंपनी, रेकॉर्ड डेट दरम्यान शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या
18
"ब्राह्मण-बनिया समाजातही गरीब लोक, त्यांना आरक्षण मिळू नये का?" मोदींचा काँग्रेसवर घणाघात
19
“याचिकेची वेळ चुकली, आता निवडणुका झाल्यावर सुनावणी”; सुप्रीम कोर्टाचा दिलासा देण्यास नकार
20
Inflation Calculator: २० आणि २५ वर्षांनंतर किती असेल १ कोटी रुपयांचं मूल्य? गणित समूजन करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग

वैनगंगेच्या पुराचा दरवर्षी 83 गावांना बसतो फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 5:00 AM

भंडारा जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगेचे विशाल पात्र आहे. वैनगंगेच्या तीरावर ९९ गावे वसली आहे. त्यापैकी ८३ गावांना पुराचा फटका बसतो. त्यात भंडारा तालुक्यातील २२, मोहाडी १२, तुमसर १५, पवनी ३३ आणि लाखांदूर तालुक्यातील नऊ गावांचा  समावेश आहे. गोसेखुर्द येथे धरण झाल्यापासून पुराची तीव्रता वाढली आहे. प्रकल्पातून अतिरिक्त झालेले पाणी विसर्ग केल्यानंतर धरणाखालील गावात पूरस्थिती निर्माण होते. 

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्याची जीवनदायी म्हणून ओळखली जाणारी वैनगंगा पावसाळा आला की कोपते. दरवर्षी येणाऱ्या पुराचा वैनगंगा नदीतीरावरील तब्बल ८३ गावांना फटका बसतो. १८ गावांचा तर संपर्क तुटतो. गतवर्षीच्या महापुराने तर सर्व उद्ध्वस्त झाले होते. यानंतरही पूरसंरक्षक भिंत आणि पुनर्वसनाकडे दुर्लक्ष होते. पूर ओसरला की सर्वच पूरग्रस्तांच्या समस्यांकडे पाठ फिरवितात. त्यामुळे दरवर्षी पावसाळा आला की ८३ गावांतील नागरिक जीव मुठीत घेऊन राहतात.भंडारा जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगेचे विशाल पात्र आहे. वैनगंगेच्या तीरावर ९९ गावे वसली आहे. त्यापैकी ८३ गावांना पुराचा फटका बसतो. त्यात भंडारा तालुक्यातील २२, मोहाडी १२, तुमसर १५, पवनी ३३ आणि लाखांदूर तालुक्यातील नऊ गावांचा  समावेश आहे. गोसेखुर्द येथे धरण झाल्यापासून पुराची तीव्रता वाढली आहे. प्रकल्पातून अतिरिक्त झालेले पाणी विसर्ग केल्यानंतर धरणाखालील गावात पूरस्थिती निर्माण होते. पाणलोट क्षेत्रात पुरेसे पाणी विसर्ग झाले नाही की बॅक वॉटर अनेक गावांमध्ये शिरते. भंडारा तालुक्यातील अर्जूनी, कोरंभी, पिंडकेपार, सुरेवाडा, मोहाडी तालुक्यातील मुंढरी बुज., ढिवरवाडा, घाटकुरोडा. तुमसर तालुक्यातील परसवाडा, तामसवाडी. पवनी तालुक्यातील सावरगाव, पवना खुर्द, जुनोना या गावांचा संपर्क तुटतो. विशेष म्हणजे मध्यप्रदेशातील संजय सरोवर आणि गोंदिया जिल्ह्यातील कालीसराट आणि पुजारीटोला प्रकल्पातील पाण्याचा विसर्गही या गावांसाठी धोकादायक असतो. त्यामुळे पूर येतो.

असा बसला आतापर्यंत महापुराचा फटका - दरवर्षी पुराचा फटका बसत असला तरी गत २० वर्षांत चार वेळा नदीतीरावरील नागरिकांना महापुराचा फटका बसला आहे. १४ ते १७ सप्टेंबर २००५ मध्ये वैनगंगेला महापूर आला होता. त्यात चार हजार लोक पूरबाधित झाले होते. ८ सप्टेंबर २०१९ रोजी संजय सरोवरातून पाणी सोडण्यात आल्याने भंडारा शहरात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. शहरातील विविध भागांत पाणी शिरले होते. गतवर्षी ३० ऑगस्ट ते १ सप्टेंबर या काळात महापूर आला. संजय सरोवरातून पाणी सोडल्याने पूरस्थिती निर्माण झाली. नागरिकांच्या मदतीसाठी एनडीआरफच्या तीन चमूंना, एसडीआरएफच्या तीन चमूंना पाचारण करण्यात आले होते. ४४ हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले होते. चौघांचा महापुरात मृत्यू झाला तर शेकडो हेक्टर जमीन नष्ट झाली होती.

प्रशासनाच्या उपाययोजना - वैनगंगा नदीच्या महापुराचा सामना करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधीकरण यंदा सज्ज झाले आहे. आंतरराज्यीय समन्वय समिती स्थापन करण्यात आली. जिल्हा नियंत्रण कक्ष, पाटबंधारे विभागाचा नियंत्रण कक्ष आणि पोलीस नियंत्रण कक्ष एकमेकांच्या संपर्कात आहे. पूरपरिस्थिती उदभवल्यास काय करता येईल याची रंगीत तालीमही घेण्यात आली. विशेष म्हणजे यावर्षी सुरूवातीपासूनच गोसेप्रकल्पातील पाणी नियंत्रणीत पद्धतीने सोडले जात आहे. त्यामुळे सध्या तरी कुठेही पूरस्थिती निर्माण झाली नाही.

 

टॅग्स :riverनदीfloodपूर