शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
3
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
4
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
5
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
6
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
7
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
8
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
9
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
10
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
11
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
12
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
13
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
14
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
15
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
16
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
17
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
18
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
19
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
20
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
Daily Top 2Weekly Top 5

आंधळगाव येथे पाण्याच्या टाकीवर चढून विरूगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:40 IST

आंधळगाव : ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या गैरप्रकारात दोषी आढळलेल्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी मोहाडी तालुक्यातील आंधळगाव येथे प्रजासत्ताक दिनी एका व्यक्तीने पाण्याच्या ...

आंधळगाव : ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या गैरप्रकारात दोषी आढळलेल्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी मोहाडी तालुक्यातील आंधळगाव येथे प्रजासत्ताक दिनी एका व्यक्तीने पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन सुरू केले. तब्बल सहा तासांनंतर त्याला खाली उतरविण्यात यश आले.

किरण हरिभाऊ सातपुते असे आंदोलन करणाऱ्याचे नाव आहे. प्रजासत्ताक दिनी पहाटे ५ वाजता गावातील उंच टाकीवर तो चढून बसला. ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या गैरप्रकार प्रकरणी दोषी आढळून आलेल्या व्यक्तींवर कारवाई करावी, अशी मागणी तो करीत होता. प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहणाच्या तयारीत असलेल्या गावकऱ्यांना हा प्रकार दिसला. त्यांनी पाण्याच्या टाकीकडे धाव घेतली. त्याला खाली येण्यासाठी आवाहन करू लागले. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीसही तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. उंच टाकीवरून किरण आपल्या मागण्या मांडत होता. दरम्यान, गटविकास अधिकारी रवींद्र वंजारी, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष सिंग बिसेन घटनास्थळी दाखल झाले. तब्बल सहा तासांच्या प्रयत्नांनंतर त्याला खाली उतरविण्यात यश आले. यावेळी गावकऱ्यांची मोठी गर्दी झाली होती.

आंधळगाव ग्रामपंचायतीमध्ये काही महिन्यांपूर्वी गैरप्रकार झाला होता. त्याबाबतची तक्रार किरण सातपुते यांनी केली होती. त्यावरून चौकशीही झाली. चौकशीत दोषी आढळलेल्या व्यक्तींकडून वसुली झाली. मात्र, कोणतीच कारवाई करण्यात आली नाही, असा आरोप किरण सातपुते करीत होता. या आंदोलनाने गावात काही काळ खळबळ उडाली होती.

गुन्हा दाखल

पाण्याच्या टाकीवर चढून आत्मदहनाचा इशारा देणाऱ्या किरण सातपुते (४८) रा. आंधळगाव याच्याविरुद्ध आंधळगाव पोलीस ठाण्यात भादंवि ३०९ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास हवालदार बाभरे करीत आहेत.