शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

गाव पांजरा, लिहिले पिपरी

By admin | Updated: June 17, 2017 00:24 IST

गावाचे नाव पांजरा रेंगेपार परंतु गावाबाहेर रस्त्याशेजारील दगडावर पिपरी गावाची नोंद करण्यात आली.

वरातीला बसला फटका : सार्वजनिक बांधकाम विभागाने गावाचे नाव बदलविले लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : गावाचे नाव पांजरा रेंगेपार परंतु गावाबाहेर रस्त्याशेजारील दगडावर पिपरी गावाची नोंद करण्यात आली. नियोजनाच्या अभावी बाहेरून येणाऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. संबंधित विभाग येथे कुंभकर्णी झोपेत दिसत आहे.तुमसरपासून १८ कि़मी. अंतरावर पांजरा रेंगेपार हे गाव आहे. गावाला जाणाऱ्या रस्त्याशेजारी दगडावर पांजरा ऐवजी पिपरी गावाचे नाव लिहिण्यात आले. या घटनेला एका महिन्यापासून जास्त दिवस लोटले, परंतु संबंधित विभागाच्या लक्षात आले नाही. दहा दिवसापूर्वी पिपरी येथे लग्नाची वरात जात होती. वरात पिपरी गावाचे नाव पाहून पांजऱ्यात थांबले नंतर त्यांना हे गाव नसल्याचे कळले.पांजरा गावापासून पिपरीचे अंतर सुमारे १२ कि़मी. इतके आहे. या रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाची मालकी आहे. या रस्त्यावर दगड लावून त्यावर गावाचे नाव लिहिण्यात आले, परंतु दगडावर रंगरंगोटी करताना निदान कोणते गाव आहे याची चौकशी करण्याची गरज होती.दगडावर नाव लिहिलेल्या स्थळापासून हाकेच्या अंतरावर पांजरा येथील घरे आहेत. किमान त्यांना विचारण्याची गरज होती. रस्त्यावरील दगडावर नाव लिहिल्यानंतर किमान संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी निश्चितच तपासणी केली असणार त्यांनी चौकशी केली होती काय, हा संशोधनाचा विषय आहे. चूक झाल्यावरही किमान ती दुरूस्ती करण्याचे योजना अजुनपर्यंत दाखविण्यात आले नाही. नियमावर बोट ठेवणाऱ्या सार्वजनिक बांधकाम खात्याचे तालुक्यातील कामे कशी असतील त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाचे येथे दुर्लक्ष दिसत असून केवळ कागदोपत्री कामे येथे सुुरू आहेत. गाव पांजरा नाव लिहीले पिपरी यावरून कामांचा दर्जा येथे दिसून येतो. -हिरालाल नागपूरे, गटनेते पं.स. तुमसर.पांजरा ऐवजी पिपरी असे चुकीने झाले असेल, तात्काळ ते नाव बदलविण्यात येईल. अनावधानाने असा प्रकार घडला असेल.-विलास घोगले, कनिष्ठ अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, तुमसर.