शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
2
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
3
Operation Sindoor Live Updates: स्फोटाचा आवाजांमुळे अमृतसरमध्ये रात्रभर ब्लॅक आऊट; पोलिस म्हणतात काहीच सापडले नाही
4
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
6
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
7
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
8
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
9
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
10
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
11
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
12
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
13
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
14
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
15
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
16
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
17
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
18
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
19
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
20
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 

पूरग्रस्त 130 गावांचा ‘व्हीडीएम’ आराखडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 05:00 IST

भंडारा जिल्ह्यात दरवर्षी महापुराचा फटका बसतो. अनेक गावांत पाणी शिरून घरांचे आणि मालमत्तेचे मोठे नुकसान होते. गतवर्षी वैनगंगा नदीला आलेल्या महापुरात प्रचंड नुकसान झाले होते. भंडारा, पवनी, तुमसर, मोहाडी, लाखांदूर हे तालुके पूरबाधित झाले होते. मध्यप्रदेशातील संजय सरोवरमधून पाणी सोडल्याने ही पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. ४४ हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले होते. चार जणांचा महापुरात बळी गेला तर अनेक पशुधनाची जीवितहानी झाली.

ठळक मुद्देगावात पाच समित्यांची स्थापना : पूरपरिस्थितीशी सामना करण्यास प्रशासन सज्ज

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : अचानक उद्भवलेल्या पूरपरिस्थितीशी सामना करताना प्रशासनासोबतच गावकऱ्यांनाही मोठे अडचणीचे जाते. गतवर्षीच्या महापुराचा अनुभव पाहता यंदा पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. पुराचा फटका बसणाऱ्या जिल्ह्यातील नदीतिरावरील १३० गावांचा गाव आपत्ती व्यवस्थापन आराखडा (व्हीडीएमपी) तयार करण्यात आला असून सरपंचापासून वायरमनपर्यंत आणि पट्टीच्या पोहणाऱ्यांचा समावेश असणारी समिती स्थापन करण्यात आली आहे. भंडारा जिल्ह्यात दरवर्षी महापुराचा फटका बसतो. अनेक गावांत पाणी शिरून घरांचे आणि मालमत्तेचे मोठे नुकसान होते. गतवर्षी वैनगंगा नदीला आलेल्या महापुरात प्रचंड नुकसान झाले होते. भंडारा, पवनी, तुमसर, मोहाडी, लाखांदूर हे तालुके पूरबाधित झाले होते. मध्यप्रदेशातील संजय सरोवरमधून पाणी सोडल्याने ही पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. ४४ हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले होते. चार जणांचा महापुरात बळी गेला तर अनेक पशुधनाची जीवितहानी झाली. जिल्हा प्रशासन, पोलीस, एनडीआरएफच्या दोन आणि एसडीआरएफच्या तीन चमूंना पाचारण करण्यात आले होते. भंडारा शहरही अर्धे जलमय झाले होते. ही परिस्थिती पुन्हा उद्भवू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने यंदा सूक्ष्म नियोजन केले आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या दोन सभा आतापर्यंत घेण्यात आल्या आहेत. त्यानुसारच आता जिल्ह्यातील पूरबाधित गावात गाव आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात आला आहे. जिल्ह्यात १५४ गावे नदीतिरावर असून दरवर्षी १३० गावांना पुराचा फटका बसतो. या गावांचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात आला आहे. सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, गावातील नागरिक आदींची समिती तयार करून काम निश्चिती करण्यात आली आहे. प्रत्येक गावात तात्पुरते निवासी शिबिर निश्चित करण्यात आले आहे. वीज, औषधी, पिण्याचे पाणी, निवासी सुविधा आधीच तयार करण्यात येणार आहे तसेच या शिबिरांमध्ये जनरेटरही उपलब्ध राहणार आहे. प्रत्येक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रात अँटीव्हेनम लसी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. प्रत्येक संभावित पूरबाधित गावांची उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. नागरिकांशी चर्चा करून पूरपरिस्थिती उद्भवल्यास काय उपाययोजना करता येईल याबाबत चर्चा केली तर जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी प्रमुख व मोठ्या प्रमाणात बाधित होणाऱ्या गावांना भेटी देऊन पाहणी केली. गावातील प्रमुख व्यक्तींशी चर्चा केली. कोणत्याही परिस्थितीत पूरपरिस्थिती उद्भवल्यास त्याचा सामना कसा करावा यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.

सरपंच, तलाठी, ग्रामसेवकांच्या अध्यक्षतेत समित्या- गाव आपत्ती व्यवस्थापन आराखड्यानुसार १३० ही गावात पाच समित्यांची निर्मिती करण्यात आली आहे. सरपंचांच्या अध्यक्षतेत तात्पुरते निवारे समिती, तलाठ्यांच्या अध्यक्षतेत गावस्तरावर संसाधन निर्मिती समिती, सरपंचांच्याच अध्यक्षतेत गाव बचाव समिती, ग्रामसेवक किंवा तलाठी यांच्या अध्यक्षतेत गाव आरोग्य समिती आणि तहसीलदारांच्या अध्यक्षतेत तालुकास्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी या पाच समित्यांच्या माध्यमातून उपाययोजना केल्या जाणार आहेत. 

पूरबाधित गावे- जिल्ह्यात १५४ गावे नदीतिरावर असून १३० गावांना महापुराचा फटका बसतो. त्यात भंडारा तालुक्यातील २७, मोहाडी १७, तुमसर २४, पवनी ३४, साकोली ३, लाखांदुर १८ आणि लाखनी तालुक्यातील ९ गावांचा समावेश आहे. वैनगंगा नदीतिरावर ९९ गावे असून त्यापैकी ८३ गावांना पुराचा फटका बसतो. चुलबंद नदीच्या तिरावरील ३१ पैकी २१, सुर नदीच्या ११ पैकी ७, कन्हानच्या ४ पैकी ३ आणि बावनथडीच्या नऊही गावांचा पुराचा फटका बसतो.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. १३ मे रोजी पहिली आणि ३ जून रोजी दुसरी सभा घेण्यात आली आहे. जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्या मार्गदर्शनात पूरपरिस्थिती हाताळण्याचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. यासोबतच आंतरराज्यीय समन्वय समितीची सभाही घेण्यात आली. जिल्ह्यात सात ठिकाणी माॅकड्रील आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाने अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे.-अभिषेक नामदास,  जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी.

 

टॅग्स :floodपूरcollectorजिल्हाधिकारी