शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

Vainganga Flood: वैनगंगा कोपली, घरात-गावात पाणीच पाणी; पटोलेंची सरकारला कळकळीची विनंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2022 13:18 IST

ब्रह्मपुरीत तालुक्यातील वैनगंगा नदीच्या काठावरील पिंपळगाव, खरकाडा, अहेरनवरगाव, रणमोचन, बेलगाव या गावांपर्यंत पुराचे पाणी पोहोचले आहे. त्यामुळे या गावांचा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे.

भंडारा - गत दोन दिवसांपूर्वी आलेला संततधार पाऊस आणि गोसेखुर्द धरणातीत पाण्याच्या विर्सगामुळे ब्रह्मपुरी तालुक्यात एक आठवड्यात दुसऱ्यांदा पूरपरिस्थिती निर्माण झाली. अनेक गावांचा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. ब्रह्मपुरी आरमोरी मुख्यमार्गासह तालुक्यातील काही गावांतील रस्ते बंद झाले आहे. त्यामुळे पुन्हा जनजीवन प्रभावित झाले आहे. भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणाचे सर्व ३३ दरवाजे उघडले. त्यामुळे वैनगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ट्विट करुन येथील भीषण पूरस्थिती दर्शवली आहे. तसेच, सरकारला कळकळीची विनंतीही केली आहे. 

ब्रह्मपुरीत तालुक्यातील वैनगंगा नदीच्या काठावरील पिंपळगाव, खरकाडा, अहेरनवरगाव, रणमोचन, बेलगाव या गावांपर्यंत पुराचे पाणी पोहोचले आहे. त्यामुळे या गावांचा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. १० आणि ११ आगस्टला ब्रह्मपुरी तालुक्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. आता एका आठवडयात दुसऱ्यांदा पूर आला आहे. किन्ही येथील विद्युत उपकेंद्र पाण्याखाली आले आहे. पुराचे पाणी वाढल्यास या उपकेंद्राला जोडलेली गाव अंधारात जाण्याची शक्यता आहे. बेटाळा फाट्यावरील महाराष्ट्र इन्स्टीट्यूट ऑफ फार्मसी आणि तंत्रनिकेतन महाविद्यालय पाण्याखाली आले आहे. या महाविद्यालयाच्या मागे असलेल्या शीतपेयाच्या कारखान्यातसुद्धा पाणी घुसले आहे. नाना पटोले यांनी ट्विट करुन सरकारला कळकळीची विनंती केली आहे. सरकारने तात्काळ मदत आणि बचावकार्य येथे पाठवावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.   दरम्यान, ब्रह्मपुरी ते आरमोरी या मार्गावरील पुलावरुन पाणी असल्याने वाहतुकीसाठी हा मार्ग बंद झाला आहे. ब्रह्मपुरी ते गांगलवाडी आरमोरी मार्ग बंद झाला आहे. लाडज, बेलगाव, बोळधा, कुडेसावली, हळदा, बरडकिन्ही, चिचगाव, बेटाळा, मालडोंगरी, नीलज, रुई, पाचगाव, खरकाडा, रणमोचन, किन्ही या गावांना पुराची झळ पोहोचली. ब्रह्मपुरीत तालुक्यातील नदीकाठालगत असलेल्या शेतांमध्ये पाणी घुसले. त्यामुळे शेकडो हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे. 

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेMumbaiमुंबईRainपाऊसfloodपूर