शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

मृत्यूपूर्वी चिता रचून ठेवण्याची दुर्दैवी वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 05:00 IST

भंडारा जिल्ह्यात काेराेनाचे तांडव सुरू आहे. दरराेज मृतांचा आकडा वाढत आहे. भंडारा शहरालगतच्या गिराेला स्मशानभूमीत दरराेज चिता धगधगत आहे. एक अंत्यसंस्कार उरकत नाही तर दुसरा तयार असताे. दिवसभर अंत्यसंस्कार सुरू असतात. माेजक्या आप्त स्वकीयांच्या उपस्थितीत नगर परिषदेचे पाच कर्मचारी अंत्यसंस्कार करतात. आता तर स्मशानभूमीत जागाही अपुरी पडू लागली. लगतचा परिसरही स्मशानभूमीसाठी घेण्यात आला.

ठळक मुद्देकाेविड स्मशानभूमी : दरराेज २० ते २५ अंत्यसंस्कारसाठी दाेन ट्रक लागतात लाकडे

ज्ञानेश्वर मुंदेलाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : मृत्यू अटळ आहे, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. मात्र काेराेनाचे मृत्युतांडव पाषाणहृदयी व्यक्तीलाही पाझर फाेडणारे आहे. दरराेज कुणाची ना कुणाची मृत्यूची वार्ता कानी पडते. काळजात चर्रर्र हाेते. सर्वसामान्यांची ही अवस्था तर काेविड स्मशानभूमीत गत वर्षभरापासून ६००वर अंत्यसंस्कार करणाऱ्यांचे काय? भंडारा येथील काेविड स्मशानभूमीत दरराेज २० ते २५ मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जात आहेत. गत काही दिवसांत मृत्यूची संख्या वाढल्याने ॲडव्हान्समध्ये सरण रचून ठेवले जात आहे. काेराेनाने मृत्यूपूर्वी चिता रचून ठेवण्याची दुर्दैवी वेळ माणसांवर आणली आहे.भंडारा जिल्ह्यात काेराेनाचे तांडव सुरू आहे. दरराेज मृतांचा आकडा वाढत आहे. भंडारा शहरालगतच्या गिराेला स्मशानभूमीत दरराेज चिता धगधगत आहे. एक अंत्यसंस्कार उरकत नाही तर दुसरा तयार असताे. दिवसभर अंत्यसंस्कार सुरू असतात. माेजक्या आप्त स्वकीयांच्या उपस्थितीत नगर परिषदेचे पाच कर्मचारी अंत्यसंस्कार करतात. आता तर स्मशानभूमीत जागाही अपुरी पडू लागली. लगतचा परिसरही स्मशानभूमीसाठी घेण्यात आला. सुरुवातीला बांधलेले चाैदा ओटे कमी पडू लागल्याने आता थेट जमिनीवरच सरण रचले जाते. एकीकडे चिता धगधगत असताना दुसरीकडे सरणही रचले जाते. ऐनवेळी गाेंधळ उडू नये, कुणाला अंत्यसंस्कारासाठी फार वेळ ताटकळत राहू नये यासाठी आता ॲडव्हान्समध्ये सरण रचून ठेवले जाते.गिराेलाच्या स्मशानभूमीत एका रांगेत रचून ठेवलेले सरण काेराेनाच्या भीषणतेची साक्ष देते. दरराेज दाेन ते तीन ट्रक लाकडे आणून स्मशानभूमीत ठेवली जातात. लाकडांचा खच कुणाच्याही काळजाचे पाणीपाणी केल्याशिवाय राहत नाही. अशा भीषण परिस्थितीत नगर परिषदेचे पाच कर्मचारी अहाेरात्र मृतदेहांवर अंत्यसंस्कार करीत आहेत.ट्रकमधून लाकडे काढण्यापासून चिता रचण्यापर्यंत आणि कुणी नातेवाईक पुढे आले नाही तर भडाग्नी देईपर्यंत त्यांना साेपस्कार पार पाडावे लागतात. पीपीई किट घालून अंत्यसंस्कार करताना या कर्मचाऱ्यांची काय अवस्था हाेत असेल आणि दरराेज मृत्यूचे तांडव अनुभवताना त्यांच्या मानसिकतेचे काय, असाही प्रश्न निर्माण हाेताे. काेविड स्मशानभूमीत अभियंता प्रशांत गणवीर, मुकादम, रक्षित दहिवले, सीताराम बांते, जशपाल साेनेकर, संदीप हुमणे, राकेश वासनिक यांच्यासह राहुल देशमुख, संग्राम कटकवार, मुकेश शेंद्रे, मुकेश झाडे, दिनेश भावसार आदी नगर परिषदेचे कर्मचारी काेराेना मृतांवर अंत्यसंस्कारासह सर्व साेपस्कार पार पाडतात. अशा कठीण परिस्थितीत आपल्या कुटुंबाची व स्वत:च्या जीवाची पर्वा न करता ही मंडळी काेराेनाग्रस्तांवर आपलेपणाने अंत्यसंस्कार करतात. 

धगधगत्या चिता सांगतात काेराेनाचे भीषण वास्तव काेविड स्मशानभूमी राष्ट्रीय महामार्गापासून काही अंतरावर आहे. राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या प्रत्येकाला या काेविड स्मशानभूमीतील धगधगत्या चिता दिसतात. काेराेनाचे काय वास्तव आहे हे या स्मशानभूमीत दिसते. गत काही दिवसांपासून तर स्मशानातील चितांची धग कमी झाली नाही उलट आता ॲडव्हान्समध्ये चिता रचून ठेवण्याची वेळ आली. काेराेना संसर्गातही बाहेर फिरून नियमाचा भंग करणाऱ्यांनी एकदा गिराेलाच्या स्मशानभूमीचे बाहेरून तरी स्मशानभूमीचे वास्तव अनुभवावे एवढीच माफक अपेक्षा.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू