शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

अनपेक्षितपणे वाजला जिल्हा परिषद निवडणुकीचा बिगूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2021 05:00 IST

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार निवडणुकीच्या तारखांची सूचना जिल्हाधिकारी १ डिसेंबर रोजी प्रसिद्ध करणार आहेत. संकेतस्थळावर नामनिर्देशनपत्र भरण्याचा कालावधी १ ते ६ डिसेंबर असून ७ डिसेंबर रोजी नामनिर्देशन पत्राची छाणणी होईल. उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तारीख १३ डिसेंबर असून जेथे अपिल आहे तेथे १५ डिसेंबर ही अंतिम तारीख राहील.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : बहुप्रतीक्षित भंडारा जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचा शुक्रवारी अपपेक्षितपणे बिगूल वाजला आणि ग्रामीण राजकारण तापायला सुरूवात झाली. जिल्हा परिषदेचे ५२ गट आणि पंचायत समितीच्या १०४ गणांसाठी २१ डिसेंबर रोजी मतदान होणार असून २२ डिसेंबर रोजी मतमोजणी होईल. तब्बल १६ महिने प्रशासक असलेल्या जिल्हा परिषदेवर आता सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.कोरोना संसर्गामुळे भंडारा जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणूक स्थगित करण्यात आली होती. मात्र जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची मुदत संपल्याने  १५ जुलै २०२० रोजी प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली. गत १६ महिन्यांपासून जिल्हा परिषदेवर प्रशासकाचे राज्य आहे. आता कोरोना संसर्ग कमी झाल्याने सर्वांना निवडणुकीच्या घोषणेची प्रतीक्षा होती. मात्र एवढ्या लवकर ही घोषणा होईल, असे कुणालाही अपेक्षित नव्हते. गुरूवारीच सुधारित आरक्षण सोडत काढण्यात आली. तसेच २१ डिसेंबर रोजी नगरपंचायतीची निवडणूक असल्याने जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक लांबेल, अशी अपेक्षा होती. मात्र शुक्रवारी दुपारी राज्य निवडणूक आयोगाने भंडारा जिल्हा परिषद आणि सात पंचायत समितीच्या निवडणुकीची घोषणा केली. अनपेक्षितपणे ही घोषणा झाल्याने इच्छुकांसह राजकीय पक्षांचीही धांतल उडाल्याचे दिसत होते.

१ डिसेंबरपासून नामांकनाला प्रारंभ

- जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार निवडणुकीच्या तारखांची सूचना जिल्हाधिकारी १ डिसेंबर रोजी प्रसिद्ध करणार आहेत. संकेतस्थळावर नामनिर्देशनपत्र भरण्याचा कालावधी १ ते ६ डिसेंबर असून ७ डिसेंबर रोजी नामनिर्देशन पत्राची छाणणी होईल. उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तारीख १३ डिसेंबर असून जेथे अपिल आहे तेथे १५ डिसेंबर ही अंतिम तारीख राहील. निवडणूक चिन्हांचे वाटप १३ डिसेंबर तर अपिल असलेल्या ठिकाणी १५ डिसेंबर रोजी करण्यात येईल. २१ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० ते ५.३० पर्यंत मतदान होणार असून २२ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

उमेदवारीसाठी सर्वच पक्षात रस्सीखेच- भंडारा जिल्हा परिषदेची गतवेळी ४ जुलै २०१५ रोजी निवडणूक झाली होती. या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने संयुक्त सत्ता हस्तगत केली होती. काँग्रेसचे २०, राष्ट्रवादीचे १५, भाजपचे १२, शिवसेनचा एक आणि अपक्ष चार असे ५२ सदस्य निवडूण आले होते. त्यावेळी काँग्रेसकडे अध्यक्ष पद गेले होते. आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत युती-आघाडीचा संभ्रम असून सर्वच पक्ष स्वतंत्र लढण्याच्या मानसीकतेत आहेत. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे. सर्वच पक्षात उमेदवारीसाठी रस्सीखेच दिसत आहे.

५२ गट व १०४ गणांत रणधुमाळी- भंडारा जिल्हा परिषदेच्या ५२ गटात आणि सात पंचायत समितीच्या १०४ गटात आता रणधुमाळीला सुरवात होणार आहे. भंडारा तालुक्यात जिल्हा परिषदेचे दहा गट असून पंचायत समितीचे २० गण आहे. मोहाडी तालुक्यात सात गट आणि १४ गण, साकोली तालुक्यात सहा गट आणि १२ गण, तुमसर तालुक्यात १० गट आणि २० गण, लाखनी तालुक्यात सहा गट आणि १२ गण, पवनी तालुक्यात सात गट आणि १४ गण तर लाखांदूर तालुक्यात जिल्हा परिषदेचे सहा गट आणि पंचायत समितीचे १२ गट आहेत.

 

टॅग्स :ZP Electionजिल्हा परिषद