अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2021 16:15 IST2021-10-21T15:48:50+5:302021-10-21T16:15:55+5:30

बुधवारी रात्री निखिल दुचाकीने आपल्या गावी धामनी येथे जात होता. कऱ्हांडला गावानजीक एका अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली. या धडकेत निखिल गंभीर जखमी झाला. अपघातानंतर चालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला.

Two-wheeler killed in collision with unknown vehicle | अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

भंडारा : अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास लाखांदूर-पवनी राज्य महामार्गावर कऱ्हांडला गावानजीक घडली. निखिल दिगांबर हुमणे (२४) रा. धामणी, ता. पवनी असे मृताचे नाव आहे.

बुधवारी रात्री निखिल दुचाकीने आपल्या गावी धामनी येथे जात होता. दरम्यान, कऱ्हांडला गावानजीक एका अज्ञात वाहनाने त्याचा दुचाकीला धडक दिली. या धडकेत निखिल गंभीर जखमी झाला तर, अपघातानंतर चालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला. कऱ्हांडला येथील नागरिकांना घटनेबाबत कळताच त्यांनी जखमी निखिलला उपचारासाठी लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

अपघाताची माहिती मिळताच ठाणेदार रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक संदीप ताराम, पोलीस अंमलदार मनीष चव्हाण यांनी घटनास्थळावर जाऊन पंचनामा केला. या घटनेप्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Two-wheeler killed in collision with unknown vehicle