शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरापासून दोन वाघ बेपत्ता !

By admin | Updated: June 30, 2016 00:43 IST

जिल्ह्यातील नागझिरा-कोका अभयारण्यातून डेंडू आणि अल्फा नामक दोन वाघ मागील वर्षभरापासून बेपत्ता आहेत.

इंडियन वाइल्डलाईफ संस्थेचा आरोप : वनमंत्र्यांना समिती गठित करण्याची मागणीभंडारा : जिल्ह्यातील नागझिरा-कोका अभयारण्यातून डेंडू आणि अल्फा नामक दोन वाघ मागील वर्षभरापासून बेपत्ता आहेत. वनविभागाचे अधिकारी या वाघांचा शोध घेऊ शकले नाही. अभयारण्यात पर्यटनाच्या दृृष्टिने हे वाघ महत्त्वपूर्ण आहेत. परंतु शोधण्याचे काम धीम्यागतीने सुरू आहे. त्यासाठी उच्चस्तरीय सत्यशोधन समिती गठित करण्याची मागणी भंडारा येथील इंडियन वाइल्ड लाईफ आर्गनाइजेशनने राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना केली आहे. शिकार होण्याची शक्यता आर्गनाइजेशनचे पदाधिकारी महेंद्र निंबार्ते, प्रकाश फुलसुंगे पत्रपरिषदेत म्हणाले, भंडारा जिल्हा हा वनसंपदेने नटलेला आहे. येथे राखीव वनक्षेत्र आणि अभयारण्य आहे. त्यामुळे दूरवरून पर्यटक नागझिरा-कोका अभयारण्यात भ्रमंतीसाठी येतात. परंतु या अभयारण्यातून डेंडू आणि अल्फा नामक दोन वाघ मागील वर्षभरापासून बेपत्ता आहेत. त्याबाबत वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडे कोणतीही माहिती नाही. या वाघांचे स्थलांतरण झाल्याची माहितीही त्यांच्याकडे नाही. त्यामुळे या वाघांची शिकार तर झाली नसावी ना असा संशय बळावल्याचेही निंबार्ते यांनी सांगितले. यासंदर्भात माहिती देण्यासाठी वनविभागाचे अधिकारी टाळाटाळ करीत आहेत. पर्यटकांच्या तक्रारींचे समाधान करीत नाहीत. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे पर्यटकांमध्ये निराशा पसरली आहे. पत्रपरिषदेत इंडियन वाइल्डलाईफ आर्गनाइजेशनचे रिशीन सरिया, सोनिया शिंगाडे व पदाधिकारी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)