शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

साकोली, लाखनी तालुक्यात होणार दोन हजार फळझाडांची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:25 IST

सबला लोकसंचालित साधन केंद्र साकोली व झेप लोकसंचालित साधन केंद्र, पालांदूर यांच्या कार्यक्षेत्रातील महिला बचत गटातील ३९० शेतकऱ्यांना प्रती ...

सबला लोकसंचालित साधन केंद्र साकोली व झेप लोकसंचालित साधन केंद्र, पालांदूर यांच्या कार्यक्षेत्रातील महिला बचत गटातील ३९० शेतकऱ्यांना प्रती शेतकरी ५ हजार रुपयांप्रमाणे रबी हंगामाकरिता खते वाटप करण्यात आली होती. याच कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांकरीता माविम व जीआयझेडच्या माध्यमातून फळझाडे लागवडीसाठी २ हजार आंबा, चिकू, पेरू, संत्रा या फळझाडांची लागवड करण्यात येत आहे. फळझाडे लागवडीसाठी तंत्रशुद्ध खड्डे खोदकामासाठी कृषी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. विजय पालवे यांच्या मार्गदर्शनातून साकोली तालुक्यातील एकोडी व लाखनी तालुक्यातील पाथरी येथे ऑनलाइन प्रशिक्षण घेण्यात आले. यावेळी जीआयझेडचे समन्वयक मयपथ नलावडे यांनी माविमच्या वतीने कोविड काळात १५ ते ३० जूनपर्यंत सर्व फळझाडांची लागवड होणार असल्याचे सांगितले. याप्रसंगी विविध जिल्ह्यातील उपजीविका समन्वयक, केंद्र व्यवस्थापक, झेप लोकसंचालित साधन केंद्र पालांदूरच्या अध्यक्ष शालिनी कोरे, व्यवस्थापक वंदना भिवगडे, लेखापाल धनंजय चौधरी, ऐकोडी येथील सरपंच भूमिता तिडके, सबला लोकसंचलित साधन केंद्र साकोली व्यवस्थापक कल्याणी गजभिये, लेखापाल सुनील कापगते यांच्यासह सहयोगिनी, बचत गटातील महिला व गावकरी उपस्थित होते. माविमच्या फळझाडे लागवड उपक्रमातून वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धनासाठी नागरिकांनाही प्रेरित केले जाणार आहे.

कोट

माविम व जीआयझेडच्या माध्यमातून राज्यातील ९ जिल्ह्यात कोविड काळात शेतकऱ्यांना खते, बियाणे व औषधी महिला बचत गटांमार्फत दिले आहे. त्यासोबतच १ लाख फळझाडे लागवड केल्याने महिला बचत गटातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात नक्कीच भर पडेल.

केशव पवार,

प्रकल्प समन्वयक, माविम महाराष्ट्र राज्य

कोट

महिला बचत गटांना बँक कर्जाच्या माध्यमातून आर्थिक मदत करून व्यवसाय वृद्धीसाठी माविम सतत प्रयत्नरत आहे. माविमनिर्मित बचत गटांमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी महिला असून त्यांना शेतीची माहिती व्हावी व योग्य त्या खते, बियाण्यांचा वापर व्हावा, यासाठी साकोली व लाखनी तालुक्यात हा प्रकल्प प्रथम राबविला जात आहे.

प्रदीप काठोळे,

जिल्हा समन्वय अधिकारी, माविम भंडारा