दोन दुचाकींची समोरासमोर धडक; दोघे गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2023 03:38 IST2023-04-08T03:37:35+5:302023-04-08T03:38:52+5:30

अपघातातील दोन्ही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने, त्यांना पुढील उपचारासाठी भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

Two people were seriously injured in a collision between two bikes in lakhandur | दोन दुचाकींची समोरासमोर धडक; दोघे गंभीर

दोन दुचाकींची समोरासमोर धडक; दोघे गंभीर

लाखांदूर : येथे दोन दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या धडकेत दोन्ही दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. ही घटना शुक्रवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील पिंपळगाव ते चिचगाव मार्गावर घडली.  प्रशांत जयदेव मस्के (२४, चिचगाव) व विजय गोपीनाथ डोंगरवार (३५, दहेगाव) अशी जखमींची नावे आहेत.

अपघातातील दोन्ही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने, त्यांना पुढील उपचारासाठी भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
 

Web Title: Two people were seriously injured in a collision between two bikes in lakhandur