ट्रकची कारला धडक दोन ठार, तीन गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 00:14 IST2019-04-28T00:13:09+5:302019-04-28T00:14:54+5:30
लग्न समारंभासाठी आलेल्या तरूणांच्या कारला ट्रकने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन जण ठार तर तीन जण गंभीर जखमी झाले. हा अपघात पवनी तालुक्यातील अड्याळ येथे शनिवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडला.

ट्रकची कारला धडक दोन ठार, तीन गंभीर
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : लग्न समारंभासाठी आलेल्या तरूणांच्या कारला ट्रकने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन जण ठार तर तीन जण गंभीर जखमी झाले. हा अपघात पवनी तालुक्यातील अड्याळ येथे शनिवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडला. जखमींना भंडाराच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
मनोज बाळाजी जुगनाके (३०), हनुमान रामाजी मेश्राम (३१) दोघेही रा. मोहपा ता. उमरेड जि.नागपूर अशी मृतांची नावे आहेत. तर विनोद बाळाजी जुगनाके (२५), शुभम यादव वाकडे (२४) आणि कार चालक राहूल रमेश पिलनाके (२६) सर्व रा. मोहपा ता. उमरेड अशी जखमींची नावे आहेत. अड्याळ येथील एका लग्न सोहळ्यासाठी मोहपा येथे तरूण कार क्रमांक एमएच ३१ डीसी ६१७६ ने आले होते. लग्न समारंभ आटोपल्यानंतर परतीच्या प्रवासात असताना अड्याळजवळील सहायता नगर येथे समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने कारला धडक दिली. यात अपघातात कारचा पूर्णत: चुराडा झाला. कारमधील मनोज जुगनाके व हनुमान मेश्राम मृत्युमुखी पडले. अपघाताची माहिती गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तात्काळ अड्याळ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने तिघांना भंडारा येथे उपचारासाठी रवाना केले.