'गुपिते तुझ्या पत्नीला सांगतो' अशी धमकी देत दोन मित्रांनीच उकळले ४ लाख रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 13:14 IST2026-02-05T13:12:24+5:302026-02-05T13:14:03+5:30

Bhandara : पवनीमध्ये दोन मित्रांनीच दगाबाजी करीत तिसऱ्या मित्राकडून ४ लाख २० हजार रुपयांची रक्कम उकळली.

Two friends extorted Rs 4 lakh by threatening to 'tell your wife the secret' | 'गुपिते तुझ्या पत्नीला सांगतो' अशी धमकी देत दोन मित्रांनीच उकळले ४ लाख रुपये

Two friends extorted Rs 4 lakh by threatening to 'tell your wife the secret'

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा :
पवनीमध्ये दोन मित्रांनीच दगाबाजी करीत तिसऱ्या मित्राकडून ४ लाख २० हजार रुपयांची रक्कम उकळली. विशेष म्हणजे, खासगी गुपिते तुझ्या पत्नीला सांगू आणि सोशल मीडियावर बदनामी करू, असे धमकावून हा प्रकार घडला. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, दोघेही मित्र फरार आहेत.

ही घटना पवनी शहरात (जि. भंडारा) घडली. पतनी येथील ताडेश्वर वॉर्ड येथील रहिवासी असलेले तक्रारदार अंशुल गभणे (३९) तसेच धनंजय दुधपचारे (४२) आणि मीनल नन्हे दुधपचारे (३८, दोघेही लाखनी) हे घनिष्ट सबंध असलेले जीवलग मित्र होते. धनंजय आणि मीनल यांना अंशुलची जवळजवळ सर्वच खासगी माहिती आणि गुपिते माहिती होती. दरम्यान, धनंजय आणि मीनल यांनी अंशुल याला ब्लॅकमेल करण्याचा कट रचला. हे थांबवायचे असेल, तर रक्कम द्यावी लागेल, असे सांगून त्याच्याकडून ४ लाख २० हजार रुपये उकळले. तरीही, त्यांच्याकडून अतिरिक्त पैशांची मागणी सुरूच होती. अंशुलने त्यांना जास्त पैसे देण्यास नकार दिल्यावर, त्यांनी त्याची खासगी माहिती सोशल मीडियावर पोस्ट करून बदनामी करण्याची धमकी दिली.

मनाचा हिय्या करून नोंदविली तक्रार

एकीकडे बदनामीची भीती आणि दुसरीकडे मित्रांकडूनच होणारी फसवणूक या कात्रीत सापडलेला अंशुल बराच तणावात आला होता. अखेर त्याने मनाचा हिय्या करून पवनी पोलिसात दोन्ही आरोपींविरूद्ध तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०८ (१), ३५१ आणि ३ (५) अंतर्गत गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक प्रीतम येवले करीत आहेत.

Web Title : पत्नी को राज बताने की धमकी देकर दोस्तों ने 4 लाख रुपये वसूले।

Web Summary : भंडारा में, दो दोस्तों ने एक व्यक्ति को ब्लैकमेल किया, उसकी पत्नी और सोशल मीडिया पर राज उजागर करने की धमकी देकर ₹4.2 लाख वसूले। पुलिस ने मामला दर्ज किया; आरोपी फरार हैं।

Web Title : Friends extort ₹4 Lakh by threatening to reveal secrets to wife.

Web Summary : In Bhandara, two friends blackmailed another, extorting ₹4.2 Lakh by threatening to expose secrets to his wife and on social media. Police have filed a case; the accused are absconding.