सासऱ्याला कालव्याच्या पाण्यात ढकलले, मृतदेह बाहेर काढण्यासाठी गेलेल्या लहान भावाचाही मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2022 12:11 IST2022-05-02T10:19:23+5:302022-05-02T12:11:34+5:30

जावयाने कालव्यात लोटून दिल्याने मोठ्या भावाचा मृत्यू झाला. तर त्याचा मृतदेह काढण्यासाठी कालव्यात उडी घेतलेल्या लहान भावाचाही मृत्यू झाला. 

Two brothers drown in canal at pauni tehsil bhandara | सासऱ्याला कालव्याच्या पाण्यात ढकलले, मृतदेह बाहेर काढण्यासाठी गेलेल्या लहान भावाचाही मृत्यू

सासऱ्याला कालव्याच्या पाण्यात ढकलले, मृतदेह बाहेर काढण्यासाठी गेलेल्या लहान भावाचाही मृत्यू

ठळक मुद्देपवनी तालुक्याच्या कोदुर्लीची घटना

पवनी ( भंडारा ) : तालुक्यातील कोदुर्ली येथे दोन सख्ख्या भावाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. जावयाने कालव्यात लोटून दिल्याने मोठ्या भावाचा मृत्यू झाला. तर त्याचा मृतदेह काढण्यासाठी कालव्यात उडी घेतलेल्या लहान भावाचाही मृत्यू झाला. 

हरी गोविंदा नागपुरे (65) व चंद्रभान गोविंदा नागपुरे (55) रा. सिंधी ता. पवनी अशी या मृत भावांची नावे आहेत. मोठा भाऊ हरी याला त्याच्या जावयाने कालव्यात ढकलले. त्यामुळे खोल पाण्यात बुडून रविवारी रात्री मृत्यू झाला. तर लहान भाऊ चंद्रभान याने मृतदेह बाहेर काढतो असे म्हणत सोमवारी सकाळी कालव्यात उडी घेतली. मात्र, पाणी जास्त असल्याने तोदेखील कालव्यात बुडाला. पोलिसांनी दोन्ही मृतदेह कालव्यातून बाहेर काढले. जवयाने आपल्या सासऱ्याला कालव्यात का लोटले याचा तपास पवनी पोलीस करीत आहे.

Web Title: Two brothers drown in canal at pauni tehsil bhandara