शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
3
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
4
IPL 2026 : अभिषेक-हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
5
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
6
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
7
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
8
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
9
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
10
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
11
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
12
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
13
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
14
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
15
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
16
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
17
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
18
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
19
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
20
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात अवघ्या सात दिवसात तब्बल अडीच हजार पाॅझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 05:00 IST

भंडारा जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा दररोज स्फोट होत असून रोजची आकडेवारी विक्रमी येत आहे. गत सात दिवसात २ हजार ५१३ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आले. केवळ ३० मार्चचा अपवाद वगळता प्रत्येक दिवशी २०० च्या वरच रुग्ण आढळून आले आहेत. शुक्रवार २६ मार्च रोजी २८५ रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर २७ मार्चला २०० तर २८ मार्च रोजी रुग्णसंख्या दुप्पट होऊन ४३९ झाली. २९ मार्च रोजी हा आकडा २५७ वर पोहोचला.

ठळक मुद्देगुरुवारी ७३३ रुग्ण : आतापर्यंत १८ हजार ३७८ कोरोनाबाधित

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : अवघ्या सात दिवसात तब्बल अडीच हजार कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने प्रशासनासह सर्वसामान्य नागरिकांची पाचावरण धारण बसली आहे. दररोज रुग्णांचा आकडा वाढत असून गुरुवारी तब्बल ७३३ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आले. कोरोना संसर्ग सुरू झाला तेव्हापासूनची ही सर्वाधिक आकडेवारी होय. जिल्ह्यात आतापर्यंत १८ हजार ३७८ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी १४ हजार ८७१ व्यक्ती कोरोनामुक्त झाले तर ३४४ जणांचा बळी गेला. सध्या ३,१६३ व्यक्ती ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.भंडारा जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा दररोज स्फोट होत असून रोजची आकडेवारी विक्रमी येत आहे. गत सात दिवसात २ हजार ५१३ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आले. केवळ ३० मार्चचा अपवाद वगळता प्रत्येक दिवशी २०० च्या वरच रुग्ण आढळून आले आहेत. शुक्रवार २६ मार्च रोजी २८५ रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर २७ मार्चला २०० तर २८ मार्च रोजी रुग्णसंख्या दुप्पट होऊन ४३९ झाली. २९ मार्च रोजी हा आकडा २५७ वर पोहोचला. धूलिवंदनामुळे चाचण्या न झाल्याने त्या दिवशी केवळ ३३ पाॅझिटिव्ह आढळून आले. ३१ मार्च रोजी ५६६ रुग्णांची नोंद झाली होती. तर गुरुवारी सर्वाधिक ७३३ रुग्ण आढळून आले आहेत. जिल्हा प्रशासनाने चाचणीची संख्या वाढविल्याने कोरोना रुग्ण वाढत असल्याचे दिसून येते. गुरुवारी ६ हजार २४७ व्यक्तींची चाचणी करण्यात आली. त्यात ७३३ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळले. त्यामध्ये भंडारा तालुक्यात ३२०, मोहाडी ६१, तुमसर १२७, पवनी ९४, लाखनी ८०, साकोली ३४, लाखांदूर १७ रुग्णांचा समावेश आहे.  गुरुवारी १११ व्यक्तींनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत १४ हजार ८७१ व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहेत. भंडारा तालुक्यातील एका ७२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा ३४४ वर पोहोचला आहे. जिल्ह्यात सध्या ३,१६३ ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. जिल्ह्यात ३१६३ ॲक्टिव्ह रुग्ण असून त्यातील सर्वाधिक १,४४७ रुग्ण एकट्या भंडारा तालुक्यातील आहेत. मोहाडी २११, तुमसर ३८७, पवनी ५३८, लाखनी ३४२, साकोली १६४, लाखांदूर ७४ रुग्णांचा समावेश आहे.

४५ वर्षावरील सर्वांना कोरोना लसीकरणजिल्ह्यात १ एप्रिलपासून ४५ वर्षावरील व्यक्तींना कोरोना लसीकरणाला प्रारंभ झाला आहे. जिल्ह्यातील १२८ केंद्रांवर लसीकरण केले जात आहे. पहिल्या दिवशी कुठेही लसीचा तुटवडा जाणवला नाही. नागरिक या ठिकाणी लसीकरणासाठी येत असल्याचे दिसून येत होते. जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी भंडारा तालुक्यातील सिल्ली, मानेगाव बाजार येथील लसीकरण केंद्राला भेट देऊन पाहणी केली. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या