शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

भंडाऱ्यावरून एसटीच्या चार बसेसच्या १२ फेऱ्या निघाल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2021 05:00 IST

खाजगी वाहनाने जीव धोक्यात घालून प्रवास सुरू आहे. कर्मचारी मात्र कोणत्याही परिस्थितीत कामावर येण्यास तयार नाही. अशा परिस्थितीत गत आठ दिवसांपासून महामंडळाने काही बसफेऱ्या सुरू केल्या आहेत. सर्वप्रथम साकोली आगारातून आठ दिवसापासून भंडारापर्यंत दररोज दोन बसच्या आठ फेऱ्या सुरू आहे. दरम्यान बुधवारी भंडारा-पवनी आणि भंडारा-नागपूर अशा दोन बस काढण्यात आल्या. पवनी बस भंडारा स्थानकावरून १२.३० वाजता सुटली.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : तब्बल ४० दिवसांपासून सुरू असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटायचे नाव घेत नाही. अशा परिस्थितीत राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी गत आठ दिवसांपासून काही बसफेऱ्या सुरू करण्याचा प्रयत्न केला. बुधवारी भंडारा बसस्थानकावरून चार बसेसच्या १२ फेऱ्या झाल्या. नागपूरला गेलेल्या बसमध्ये खचाखच प्रवासी भरून होते. संप मिटविण्यासाठी स्थानिक पातळीवरही अधिकारी प्रयत्न करीत आहे. मात्र कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. खाजगी वाहनाने जीव धोक्यात घालून प्रवास सुरू आहे. कर्मचारी मात्र कोणत्याही परिस्थितीत कामावर येण्यास तयार नाही. अशा परिस्थितीत गत आठ दिवसांपासून महामंडळाने काही बसफेऱ्या सुरू केल्या आहेत. सर्वप्रथम साकोली आगारातून आठ दिवसापासून भंडारापर्यंत दररोज दोन बसच्या आठ फेऱ्या सुरू आहे. दरम्यान बुधवारी भंडारा-पवनी आणि भंडारा-नागपूर अशा दोन बस काढण्यात आल्या. पवनी बस भंडारा स्थानकावरून १२.३० वाजता सुटली. त्यात जाताना ३८ तर येताना ४५ प्रवासी होते. नागपूरसाठी दुपारी २.३० वाजता सुटलेल्या बसमध्ये तब्बल ५८ प्रवासी होते. दोन बसेसच्या १२ फेऱ्यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रवाशांसी संवादभंडारा ते पवनी या बसमध्ये विभागीय वाहतूक नियंत्रक डॉ. चंद्रकांत वडसकर यांनी बुधवारी स्वत: प्रवास केला. त्यावेळी त्यांनी प्रवाशांसी संवाद साधला. एसटी बसच्या दोन फेऱ्या का होईना सुरू झाल्याने आनंद होत असल्याचे सांगितले. या बसमधून अनेक विद्यार्थ्यांनी प्रवास केला. बससेवा सुरळीत व्हावी, अशी अपेक्षा यावेळी सर्वच प्रवासी व्यक्त करीत असल्याचे डॉ. चंद्रकांत वडसकर यांनी सांगितले.

कर्मचाऱ्यांना आवाहन- राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी कामावर यावे यासाठी परिवहन मंत्री अनिल परब यांनी वेळोवेळी आवाहन केले. याबाबत भंडारा विभागाचे विभागीय वाहतूक नियंत्रक डॉ. चंद्रकांत वडसकर यांनी गत दोन दिवसात आंदोलनात असलेल्या कर्मचाऱ्यांची भेट घेतली. आगारासमोर सुरू असलेल्या मंडपात भेट देवून त्यांनी परिवहन मंत्र्यांना निरोप दिला. प्रथम कामावर हजर व्हा, योग्य न्याय मिळेल असे सांगितले. परंतु अद्यापपर्यंत कर्मचाऱ्यांकडून कोणताही प्रतिसाद मिळताना दिसत नाही.

 

टॅग्स :ST Strikeएसटी संप