शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

उत्पन्न दुप्पट करण्यासाठी प्रयत्न करावे

By admin | Updated: June 12, 2017 00:32 IST

शासनाने सन २०१७-१८ ते २०२१-२२ या पाच वर्षाच्या कालावधीत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट कसे होईल,

निमचंद्र चांदेवार : २५ गावात उन्नत शेती, समृद्ध शेतकरी योजनेची सभालोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : शासनाने सन २०१७-१८ ते २०२१-२२ या पाच वर्षाच्या कालावधीत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट कसे होईल, याचे नियोजन केले आहेत. यासाठी शासन कामाला लागले आहे. शेतीच्या शाश्वत विकासासाठी सर्व कामे नियोजनात समाविष्ट करण्यात आली असल्याचे प्रतिपादन करडीचे कृषी पर्यवेक्षक निमचंद्र चांदेवार यांनी केले. उन्नत शेती समृद्ध शेतकरी योजनेअंतर्गत जांभोरा गावात रोजगार हमी योजनेच्या कामावर सभा घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. लोकसहभागातून ही कामे यशस्वी करण्याचा मानस शासनाचा आहे. त्यासाठी करडी परिसरातील २५ गावात उन्नत शेती - समृद्ध शेतकरी योजनेअंतर्गत विविध ठिकाणी सभांचे आयोजन करून जनजागृती केली जात आहे. दरवर्षी सन २०२१-२२ पर्यंत अशा सभा घेतल्या जाणार आहेत. शेतकऱ्यांनी शेतीचे उत्पन्न वाढीसाठी प्रयत्नरत व्हावे, कृषी विभागाची मदत घ्यावी असे प्रतिपादन करडीचे कृषी पर्यवेक्षक निमचंद्र चांदेवार यांनी यावेळी केले.उपरोक्त योजनेअंतर्गत खडकी, बोंडे, ढिवरवाडा, डोंगरदेव, मुंढरी बु., मुंढरी खुर्द, निलज खुर्द, निलज बुज, नरसिंगटोला, देव्हाडा खुर्द, देव्हाडा बुज, जांभळापाणी, मोहगाव, नवेगाव, करडी, दवडीपार, कान्हळगाव, पांजरा, बोरी, बोरगाव, पालोरा, केसलवाडा, लेंडेझरी,जांभोरा, किसनपूर आदी २५ गावात कृषी पर्यवेक्षक निमचंद्र चांदेवार, कृषी सहाय्यक वाडीभस्मे, यादोराव बारापात्रे, निखारे, कृषी मित्र यांच्या सहाय्याने या सभा घेण्यात आल्या. सभांना मार्गदर्शन करण्यात आले. मृग नक्षत्रामध्ये करावयाच्या कामांची माहिती देण्याबरोबर, मशागतीचे तंत्र, बि बियाण्यांची निवड करण्याच्या पद्धती, पेरणीपूर्व मशागत, बियाण्यांची उगवण क्षमता वाढविण्यासाठी कराव्या लागणाऱ्या प्रक्रिया, खते, पाणी व कीटकनाशकांच्या आवश्यकतेनुसार वापर आदी व अन्य बाबींवर सविस्तर मार्गदर्शन या वेळी शेतकऱ्यांना करण्यात आले.पीकविमा योजना, मागेल त्याला शेततळे, बोडी, पिकांची पूर्व मशागती पासून ते पीक काढणी, मळणी पर्यंतचा मजुरीवर खर्च, खर्च कमी करणे, शेतीसाठी यांत्रिकीकरणाचा वापर, गोपीनाथ मुंडे अपघात विमा आदी बाबतही मार्गदर्शन व माहिती देण्यात आली. सभा ग्रामपंचायत कार्यालय, समाजमंदिर, रोहयो कामावर घेण्यात आल्या. या सभेत मिळालेल्या माहितीनुसार शेतकरी कामाचे नियोजन करेल असा विश्वास व्यक्त होत आहे. सभेला मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.