शहरं
Join us  
Trending Stories
1
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
2
"ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
3
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
4
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
5
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
6
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
7
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
8
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
9
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
10
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
11
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
12
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
13
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
14
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
15
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
16
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
17
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
18
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
19
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
20
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू

बछडे गमावलेली वाघीण वनविभागाच्या कॅमेऱ्यात ट्रॅप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 5:00 AM

भंडारा तालुक्यातील गराडा गावाजवळ टेकेपार उपसा सिंचन प्रकल्पाच्या कालव्यातील सायफन टाक्यात बुडून वाघाच्या दोन बछड्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली. या पिलांची आई (वाघीण) याच परिसरात असावी, असा कयास वनविभागाला होता. बछड्यांच्या मृत्यूमुळे ती हिंस्त्र होण्याची शक्यता आहे. यामुळे तिचा शोध घेण्यासाठी वनविभागाने परिसरात चार कॅमेरे लावले. बुधवारी या चारही कॅमेऱ्यात ती दिसून आली.

ठळक मुद्देगराडाजवळ संचार : परिसरातील गावांना दिला सतर्कतेचा इशारा, वनविभाग लक्ष ठेवून

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : दोन बछडे गमावलेली वाघीण वनविभागाने लावलेल्या कॅमेऱ्यात बुधवारी ट्रॅप झाली. या वाघिणीचा गराडा परिसरात संचार असून, नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन वनविभागाच्यावतीने करण्यात आले आहे.भंडारा तालुक्यातील गराडा गावाजवळ टेकेपार उपसा सिंचन प्रकल्पाच्या कालव्यातील सायफन टाक्यात बुडून वाघाच्या दोन बछड्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली. या पिलांची आई (वाघीण) याच परिसरात असावी, असा कयास वनविभागाला होता. बछड्यांच्या मृत्यूमुळे ती हिंस्त्र होण्याची शक्यता आहे. यामुळे तिचा शोध घेण्यासाठी वनविभागाने परिसरात चार कॅमेरे लावले. बुधवारी या चारही कॅमेऱ्यात ती दिसून आली. टी १० वाघीण असून, तिचे हे पहिलेच बछडे होते. दरम्यान, सीसीएफ मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) कल्याणकुमार यांनी आज भेट देऊन गराडा परिसराची पाहणी केली. लघुपाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्याचे सांगण्यात आले. प्रीकास्ट सीमेंटचे आवरण केले जाणा आहे. या वाघिणीवर उपवनसंरक्षक शिवराम भलावी आणि वनपरिक्षेत्राधिकारी विवेक राजूरकर लक्ष ठेवून आहेत.

बछड्यांच्या शोधात वाघिणीची तळमळ पाण्याच्या टाकीत बुडून मरण पावलेल्या बछड्यांसाठी वाघीण सैरभैर झाल्याचे दिसून आले. ज्या ठिकाणी बछडे मृत्युमुखी पडले, त्या ठिकाणी वाघीण वारंवार वाकून पाहत असल्याचे ट्रॅप कॅमेऱ्यात दिसून आले. ही आणखी १५ ते २० दिवस या परिसरात राहील, असा अंदाज वनविभागाच्या वतीने वर्तविण्यात आला आहे. 

 

टॅग्स :Tigerवाघ