शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेमुळे वाहतुकीची कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2016 00:32 IST

देव्हाडी येथील उड्डाणपुल अंडरपासचे बांधकाम सुरु आहे. निधीअभावी उड्डाणपुलाचे बांधकाम कासवगतीने सुरु आहे.

निधीअभावी काम संथगतीने : अंडरपासचे काम प्रगतीपथावरतुमसर : देव्हाडी येथील उड्डाणपुल अंडरपासचे बांधकाम सुरु आहे. निधीअभावी उड्डाणपुलाचे बांधकाम कासवगतीने सुरु आहे. रेल्वे क्रॉसिंगसह बायपास रस्त्यावर वाहतुकीची प्रचंड कोंडी दररोज सुरु असून या मार्गावर अपघाताची भिती व्यक्त करण्यात येत आहे.मुंबई हावडा रेल्वे क्रॉसिंग क्रमांक ५३२ तुमसर- रामटेक - गोंदिया मार्गावर देव्हाडी येथे आहे. वाहतुकीची प्रचंड कोंडी निर्माण होत असल्याने येथे उड्डाणपुल मंजूर करण्यात आले. अडीच वर्षापूर्वी उड्डाणपुल बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. प्रथम बायपास रस्ता तयार करण्यात आला. नंतर देव्हाडीवासी तथा रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या प्रवाशांकरिता अंडरपास पुलाचे बांधकाम सुरु करण्यात आले. आठ ते नऊ महिन्यापूर्वी बायपास रस्त्यावरून वाहतूक सुरु करण्यात आली. तुमसर - गोंदिया - रामटेक - भंडारा राज्य महामार्ग येथून जातो. प्रचंड रहदारी या रस्त्यावर दररोज आहे. उड्डाणपुल बांधकामाची गती कासगवतीने सुरु आहे. संबंधित कंत्राटदाराचे बिलही येथे थकीत असल्याची माहिती आहे. राज्य शासन व रेल्वे प्रशासन येथे संयुक्तपणे उड्डाणपुलाचे बांधकाम करीत आहे. राज्य शासन बायपास रस्ता, अंडरपास तथा दोन्ही बाजूला -- कामे करणार आहे. तर रेल्वे प्रशासन रेल्वे ट्रॅकवरील उड्डाणपुल सिमेंट बांधकाम करणार आहे. रेल्वे प्रशासनाने अजूनपर्यंत निविदा काढली नाही असे समजते.४३ कोटींचा हा उड्डाणपुल आहे. २६ कोटी राज्य शासन तर १७ कोटी रेल्वे प्रशासन खर्च करणार आहे. राज्य शासनाचे संबंधित खात्याचे अधिकारी तज्ज्ञांचे येथे पथक येऊन गेले. स्थानिक लोकप्रतिनिधी तथा खासदारांनी येथे लक्ष घालण्याची गरज आहे. कामाचा वेग असाच सुरु राहिला तर किमान उड्डाणपुल निर्माण करण्याकरिता एक दशक लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. (तालुका प्रतिनिधी)