शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
2
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
3
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
4
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
5
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
6
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
7
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
8
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
9
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
10
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
11
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
12
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
13
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
14
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
15
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
16
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...
17
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
18
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
19
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
20
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...

१०० वर्ष जुन्या मांगठ्यावर तयार होतात परंपरागत सुती गोणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 5:00 AM

जिल्ह्यात विणकरांची संख्या मोठी आहे. काही वर्षापूर्वी चकारा येथे सुमारे २०० विणकर शाॅल, गोणा, लुगडे, ब्लँकेट, धोतर आदी तयार करीत होते. त्या काळात त्याला मोठी मागणीही होती. परंतु आधुनिक तंत्रज्ञानाने हातमाग व्यवसाय मागे पडला. अनेक जण आता नोकरी - व्यवसायात रमले आहेत. चकारा येथे केवळ दोन घरी विणकाम केले जाते. तेथेही केवळ सुती गोणे तयार करतात. गुलाब वालदे यांच्या घरी दीडशे वर्षांपासून परंपरागत विणकाम केले जाते.

ठळक मुद्देचकारा येथे एकमेव हातमागावर विणकाम

  लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कधी काळी भंडारा जिल्ह्यातील गावागावांत सुरु असलेले हातमाग आता काळाच्या ओघात बंद पडले असले तरी पवनी तालुक्यातील चकारा येथे एक परिवार १०० वर्ष जुन्या मांगठ्यावर आजही सुती गोणे तयार करीत आहेत. पुर्वी सारखी मागणी नसली तरी आपला परंपरागत व्यवसाय या परिवाराने टिकवून ठेवला आहे. जिल्ह्यात विणकरांची संख्या मोठी आहे. काही वर्षापूर्वी चकारा येथे सुमारे २०० विणकर शाॅल, गोणा, लुगडे, ब्लँकेट, धोतर आदी तयार करीत होते. त्या काळात त्याला मोठी मागणीही होती. परंतु आधुनिक तंत्रज्ञानाने हातमाग व्यवसाय मागे पडला. अनेक जण आता नोकरी - व्यवसायात रमले आहेत. चकारा येथे केवळ दोन घरी विणकाम केले जाते. तेथेही केवळ सुती गोणे तयार करतात. गुलाब वालदे यांच्या घरी दीडशे वर्षांपासून परंपरागत विणकाम केले जाते. त्यांच्याकडे १०० वर्ष जुना मांगठा असून तो लाकडापासून बनविलेला आहे. आजही त्यावरच विणकाम केले जाते. ४२ फुटापर्यंत लांबीचे गोणे येथे तयार होतात. दिवसाला एक गोणा तयार होत असून आठवड्यात पाच ते सहा गोणे तयार केले जातात. एक हजार रुपयाला या गोण्यांची विक्री होते. या कामात गुलाब वालदे यांच्या पत्नीही सहकार्य करतात. मात्र योग्य माेबदला मिळत नाही.

हातमाग महामंडळाने काम केले बंदहातमाग महामंडळाच्या माध्यमातुन हातमागाला प्रोत्साहन दिले जायचे. अनेक कुटुंब त्यात सहभागी होते. दुरदूरपर्यंत उत्पादनाची मागणी होती. परंतु अलीकडे फॅन्सी माल हवा आहे. आता हा माल चालत नाही. असे सांगून १९९८ साली हातमाग महामंडळाने काम बंद केले, असे चकारा येथील गुलाब वालदे यांनी सांगितले. त्यावेळी आम्ही हवा तसा माल देऊ असे सांगितले. परंतु उपयोग झाला नाही. अनेक जण आज बेरोजगार झाल्याचेही ते म्हणाले. 

हँडलूम क्लस्टरसाठी ग्रीन हेरीटेजचा पुढाकारभंडारा जिल्ह्यातील हातमाग व्यवसायाला चालना देण्यासाठी ग्रीन हेरीटेज या संस्थेने आता पुढाकार घेतला आहे. संस्थेचे अध्यक्ष मो.सईद शेख यांनी चकारा येथे भेट देऊन विणकरांशी संवाद साधला. या उद्योगासाठी येथे पुरक वातावरण असून वस्त्रोद्योग मंत्रालयाकडून हँडलूम क्लस्टर तयार करण्यासाठी जिल्हाधिकारी संदीप कदम यांना निवेदन दिल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :businessव्यवसाय