शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
2
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
3
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
4
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
5
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
6
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
7
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
8
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
10
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
11
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
12
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
13
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
14
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
15
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
16
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
17
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
19
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
20
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
Daily Top 2Weekly Top 5

धनेगाव कालव्याजवळ आढळला व्यापाऱ्याचा मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 06:00 IST

अमित माणिकचंद मेश्राम (३०) रा.सिहोरा असे मृताचे नाव आहे. तो मुळचा मध्यप्रदेशातील फुलचूर येथील रहिवासी आहे. व्यवसायाच्या निमित्ताने तो सिहोरा येथील साई कॉलनीत भाड्याने खोली घेऊन राहत होता. विशेष म्हणजे अमीतचा विवाह ठरला होता. सोमवारी तो कटंगी येथे नियोजित सासरच्या मंडळींना भेटण्यासाठी गेला. त्यानंतर तेथून सिहोरा येथे परत आला.

ठळक मुद्देखुनाचा संशय : मृत सिहोरा येथील माही साडी सेंटरचा संचालक

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : तुमसर तालुक्यातील सिहोरा येथील माही साडी सेंटरच्या संचालकाचा मृतदेह धनेगाव शिवारातील कालव्याजवळ सोमवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास आढळून आला. सदर कापड विक्रेत्याचा खून करण्यात आल्याचा संशय व्यक्त होत असून पोलिसांनी या प्रकरणी तुर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली. या घटनेने सिहोरा परिसरात एकच खळबळ उडाली आहे.अमित माणिकचंद मेश्राम (३०) रा.सिहोरा असे मृताचे नाव आहे. तो मुळचा मध्यप्रदेशातील फुलचूर येथील रहिवासी आहे. व्यवसायाच्या निमित्ताने तो सिहोरा येथील साई कॉलनीत भाड्याने खोली घेऊन राहत होता. विशेष म्हणजे अमीतचा विवाह ठरला होता. सोमवारी तो कटंगी येथे नियोजित सासरच्या मंडळींना भेटण्यासाठी गेला. त्यानंतर तेथून सिहोरा येथे परत आला. ५ वाजताच्या सुमारास त्याच्या मोबाईलवर कॉल आला आणि तो धनेगाव शिवारात गेला. रात्री उशिरापर्यंत घरी परत आला नाही. त्यामुळे त्याचा मोठा भाऊ राहुल मेश्राम व त्याच्या मित्रांनी शोध घेतला असता कालव्यावजळ त्याचा मृतदेह आढळून आला.या घटनेची माहिती सिहोरा पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. तुर्तास पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे.मात्र घटनास्थळावरील परिस्थिती पाहता अमीतचा कुणीतरी खून केला असावा असा संशय आहे. सायंकाळच्या सुमारास अमीतच्या वाहनाजवळ तीन ते चार उभे असल्याचे बघितले होते. परंतु पार्टी असेल असे समजून त्यांनी दुर्लक्ष केले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.दरम्यान अमितच्या पार्थिवावर फुलचूर येथे दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. दिलखुलास आणि मनमिळावू स्वभावाच्या अमीतच्या मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे.घटनास्थळावर आढळले चार ग्लासअमीत मेश्राम यांचा मृतदेह आढळला त्या परिसरात मद्याचे चार रिकामे ग्लास आढळून आले. शिवाय अनोळखी इसमाचा गॉगल आणि नास्त्याचे साहित्य आढळून आले. अमितच्या मोबाईलची तोडफोड करण्यात आली होती. तसेच त्याला ५० फूट फरफटत नेल्याच्या खुणाही घटनास्थळावर दिसत आहेत.प्रेमप्रकरणाचा संशयअमीत मेश्रामचे गावातील एका तरुणीसोबत प्रेमप्रकरण असल्याची चर्चा आहे. या दोघांचे फोटो मोबाईलमध्ये होते. सदर फोटो त्या मुलीच्या आईलाही अमीतने दाखविले होते. परंतु गेल्या आठवड्यात सदर मुलीचे लग्न ठरले. साखरपुडा झाला होता. फोटो व्हायरल होण्याची भीती होती. त्यातून तर अमीतचा खून झाला नाही ना? असा संशय व्यक्त होत आहे.

टॅग्स :Murderखून