शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

Video : भंडाऱ्यामध्ये वडापाची ट्रॅक्स नदीत कोसळली; सहा ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2019 19:26 IST

साकोली-लाखांदूर मार्गावरील धर्मपुरी येथील चुलबंद नदीवर हा अपघात झाला.

- संजय साठवणे

साकोली (भंडारा) : अवैध प्रवासी वाहतूक करणारी भरधाव काळीपिवळी जीप पुलावरून नदीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात सहा जण ठार तर सात जण गंभीर जखमी झाले. हा अपघात साकोली ते लाखांदूर मार्गावरील कुंभली गावाजवळील चुलबंद नदीवर मंगळवारी दुपारी ३.३० वाजता घडला. मृतांमध्ये चार विद्यार्थिनी असून बारावीत उत्तीर्ण झाल्यानंतर बीएससीच्या प्रवेशासाठी त्या साकोली येथे आल्या होत्या. 

शीतल सुरेश राऊत (१२), अश्विनी सुरेश राऊत (२२) दोघीही राहणार सानगडी, शिल्पा श्रीरंग कावळे (२०), शारदा गजानन गोटफोडे (४५) दोघेही राहणार सासरा, सुरेखा देवाजी कुंभरे (२०) रा.सासरा टोली आणि गुनगुन हितेश पालांदुरकर (१५) रा.गोंदिया अशी मृतांची नावे आहेत. तर वंदना अभिमन सतीमेश्राम (५०), डिंपल श्रीरंग कावळे (१८), अभिमन तातोबा सतीमेश्राम (४५) तिघेही राहणार सासरा, शुभम नंदलाल पातोळे (२०) रा.तई, विणा हितेश पालांदूरकर (३०), सिद्धी हितेश पालांदुरकर (५) दोघेही राहणार गोंदिया आणि मालन तुळशीराम टेंभुर्णे (६५) राहणार खोलमारा जैतपूर अशी जखमींची नावे आहेत. यापैकी वंदना, डिंपल व शुभमची प्रकृती चिंताजनक असून त्यांना भंडारा येथील रुग्णालयात उपचारासाठी रवाना करण्यात आले.

साकोली येथून प्रवासी घेऊन काळीपिवळी जीप (क्रमांक एमएच ३१ एपी ८२४१) लाखांदुरकडे मंगळवारी दुपारी जात होती. कुंभली येथील चुलबंद नदीपुलावर समोरुन आलेल्या वाहनाने काळीपिवळी जीपला डॅश दिला. त्यामुळे चालकाचे नियंत्रण गेले आणि जीप थेट ४० फुट खोल चुलबंद नदीच्या पात्रात कोसळली. अपघाता एवढा भीषण होता की, काळीपिवळीचा अक्षरश: चुराडा झाला होता. अपघाताची माहिती होताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच साकोलीचे ठाणेदार बंडोपंत बनसोडे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. जखमींना बाहेर काढून मिळेल त्या वाहनाने साकोली येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या जीपमधून सासरा आणि सानगडी येथील बहुतांश प्रवाशी प्रवास करीत होते. सासरा व सानगडी येथील बारावीत उत्तीर्ण विद्यार्थिनी साकोली येथे बीएससीच्या प्रवेशासाठी आल्या होत्या. गावी परत जाण्यासाठी या जीपमधून त्या प्रवास करीत होत्या. मृतामध्ये दोन सख्ख्या बहिणींचा समावेश आहे.

अपघाताचे वृत्त सानगडी आणि सासरा येथे कळताच गावकºयांनी साकोली येथील रुग्णालयात धाव घेतली. रुग्णालयात प्रचंड गर्दी झाली होती. घटनास्थळाला पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अपर पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर यांनी भेट दिली. तसेच रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. या अपघाताने संपूर्ण भंडारा जिल्ह्यावर शोककळा पसरली.

अवैध प्रवासी वाहतुकीचे बळीभंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध प्रवासी वाहतूक सुरु आहे. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवून कालबाह्य वाहनातून प्रवास घडविला जातो. कुंभलीजवळ झालेल्या अपघातातील बळी हे अवैध प्रवासी वाहतुकीचेच आहेत. साकोली येथून विविध मार्गावर दिवसभरातून ५० ते ६० वाहने प्रवासी वाहतूक करतात. मात्र पोलीस त्यांच्यावर कोणतीही कारवाई करीत नाही.

 

टॅग्स :Accidentअपघात