शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटनावर आधारित रोजगार निर्मितीवर लक्ष्य केंद्रित

By admin | Updated: April 25, 2017 00:15 IST

जिल्ह्याला निसर्गाची खूप मोठी देणं आहे. आपल्या जिल्ह्यात पाणी मुबलक प्रमाणात आहे.

रोजगार निर्मितीवर भर : लेक टुरिझमसह टुरिझम सर्किटचा प्रस्ताव, वैनगंगा महोत्सव होणारभंडारा : जिल्ह्याला निसर्गाची खूप मोठी देणं आहे. आपल्या जिल्ह्यात पाणी मुबलक प्रमाणात आहे. पाणी आणि वाघ असे समीकरण आपल्या जिल्ह्यात आहे. ते सहसा कुठे आढळत नाही. या निसर्गाच्या स्त्रोताला मानव संसाधनात परिवर्तीत करून पर्यटनावर आधारित रोजगार निर्मितीला चालना दिल्यास पुढील दोन वर्षात १ लाखावर रोजगार निर्माण होतील अशी सूचना खासदार नाना पटोले यांनी मांडली. या सूचनेवर जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एकत्रित काम करण्याची ग्वाही दिली.जिल्हाधिकारी कार्यालयात निवडक वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत खासदार नाना पटोले यांनी चर्चा केली. जिल्हाधिकारी सुहास दिवसे, जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू, मुख्य कार्यकारी अधिकारी शरद अहिरे, उपवनसंरक्षक उमेश वर्मा, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता प्रसाद नार्वेकर उपस्थित होते.जिल्ह्यात रोजगार निर्मिती, वनपर्यटन, कृषी विकास, डिजीटल शाळा, गोसेखुर्द व बावनथडी प्रकल्प, लेक टुरिझम, मामा तलावाचे पुनरूज्जीवन, एकात्मिक पाणलोट विकास, टुरिझम सर्कीट, वैनगंगा महोत्सव, आरोग्य व क्रीडा विकास यासह विविध विषयावर यावेळी चर्चा करण्यात आली. भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात फॉरेस्ट आहे. वनावर आधारित पर्यटनाला खूप वाव आहे. वनपर्यटन ही संकल्पना साकारल्यास मोठ्या संख्येने रोजगार देण्याची क्षमता आपल्या फॉरेस्टमध्ये असल्याचे खासदार म्हणाले. त्यासोबतच गोसेखुर्दचे बॅक वॉटर सुद्धा पर्यटन व रोजगार निर्मितीचा पर्याय होवू शकतो. बॅक वॉटरवर लेक टुरिझम केल्यास अनेक तरुणांना रोजगार मिळू शकतो अशी कल्पना त्यांनी मांडली. यावर सविस्तर प्रस्ताव तयार करण्याचे ठरले.विदर्भ ही वाघांची नगरी म्हणून ओळखल्या जाते. आपल्या जिल्ह्यात वाघ आहेत. त्याप्रमाणे ताडोबा, उमरेड आदी ठिकाणी सुद्धा वाघांची संख्या मोठी आहे. शासन विदर्भाचे टुरिझम सर्कीक तयार करीत आहे. यामध्ये भंडाऱ्याचा समावेश करण्यात येणार आहे. इतर ठिकाणी येणारे पर्यटक आपसुकच आपल्या जिल्ह्यात येणार व त्यामुळे येथील युवकांना पर्यनावर आधारित रोजगार प्राप्त होणार असे त्यांनी सांगितले. यामधून पुढील दोन वर्षात १ लाखावर रोजगार निर्मिती होईल. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पर्यटकांना आकषिरत करण्यासाठी वैनगंगा महोत्सवाची संकल्पना त्यांनी मांडली. वैनगंगा महोत्सव हा केवळ महोत्सव राहणार नसू तो जिल्ह्याच्या पर्यटनाला नवी चालना देणारा ठरणार आहे. हा महोत्सव जिल्ह्याची परंपरा, संस्कृती, लोककला, खाद्य संस्कृती, नाट्यकला यांचा संगम असणार आहे. आपल्या जिल्ह्यात विविधतापूर्ण अशा अनेक गोष्टी आहेत. या सगळ्या बाबी या महोत्सवाच्या माध्यमातून जगासमोर येतील आणि त्याचा फायदा रोजगार निर्मितीसाठी होणार आहे. हा महोत्सव केवळ उपचार राहू नये यासाठी जिल्हा मुख्यालयासोबत तालुका मुख्यालय व गावपातळीवर आयोजन करण्याची संकल्पना त्यांनी मांडली. या महोत्वाचे भव्य आयोजन करण्यावर यावेळी चर्चा करण्यात आली. (प्रतिनिधी)