शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

यंदाही पाेळा भरणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 05:00 IST

श्रमाची प्रतिष्ठा जाेपासणारा हा सण हाेय. बैलांना सजवून ताेरणाखाली आणले जाते. तसेच बैलांची मिरवणूकही काढली जाते. प्रत्येक गावात पाेळा सण उत्साहात साजरा केला जाताे. मात्र गतवर्षी काेराेना संसर्गामुळे पाेळा भरविण्यात आला नाही. मात्र आता काेराेना संसर्ग कमी झाला आहे. त्यामुळे यंदा पाेळा भरविण्यास परवानगी मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना हाेती. मात्र जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी परिपत्रक काढून पाेळा भरविण्यावर प्रतिबंध घातला आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : श्रमप्रतिष्ठेचा गाैरव करणारा पाेळा शेतकरी माेठ्या उत्साहात साजरा करतात. मात्र गतवर्षी काेराेना संसर्गामुळे पाेळा भरविण्यात आला नव्हता. जिल्ह्यात आता काेराेना संसर्ग कमी झाल्याने तसेच सर्व व्यवहार सुरळीत असल्याने पाेळा भरविला जाईल, अशी शेतकऱ्यांना आशा हाेती. मात्र संभाव्य तिसऱ्या लाटेच्या भीतीने यंदाही माेठा व तान्हा पाेळा भरविण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी एका आदेशान्वये मनाई केली आहे. तसेच बैलांच्या मिरवणुकी काढण्यावरही प्रतिबंध घातला आहे. पाेळा आणि इतर धार्मिक कार्यक्रम घरीच साजरे करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. पाेळा हा कृषिप्रधान संस्कृती महत्त्वाचा सण मानला जाताे. श्रमाची प्रतिष्ठा जाेपासणारा हा सण हाेय. बैलांना सजवून ताेरणाखाली आणले जाते. तसेच बैलांची मिरवणूकही काढली जाते. प्रत्येक गावात पाेळा सण उत्साहात साजरा केला जाताे. मात्र गतवर्षी काेराेना संसर्गामुळे पाेळा भरविण्यात आला नाही. मात्र आता काेराेना संसर्ग कमी झाला आहे. त्यामुळे यंदा पाेळा भरविण्यास परवानगी मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना हाेती. मात्र जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी परिपत्रक काढून पाेळा भरविण्यावर प्रतिबंध घातला आहे.माेठा व तान्हा पाेळा सण सार्वजिनकरीत्या भरविण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात आली आहे. बैलाची पूजा व अन्य धार्मिक कार्यक्रम घरीच करण्याचे आवाहन केले आहे. पाेळ्यानिमित्त बैलाच्या मिरवणुकी काढण्यावरही प्रतिबंध आणण्यात आले आहे. आरती, पूजा व अन्य धार्मिक कार्यक्रम आयाेजित करताना गर्दी हाेणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बैलाची पूजा करताना काेराेना विषाणूचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा व फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे असे निर्देश देण्यात आले आहे.

आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई- पाेळा सणानिमित्त जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती व समूहावर साथराेगप्रतिबंधक १८९७, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५, तसेच भारतीय दंड संहिता १८६०च्या कलमान्वये कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिले आहे.

तिसऱ्या लाटेची भीती कायमराज्यात काेविड टास्क फाेर्सने काेराेना महामारीच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली आहे. भंडारासह राज्यातील काही भागात काेराेना टेल्टा प्लसचे रुग्ण आढळून आले आहे. ब्रेक द चेनअंतर्गत व्यवहारास मुभा देण्यात आली असली तरी सणउत्सवात हाेणारी गर्दी तिसऱ्या लाटेस कारणीभूत ठरण्याची भीती आहे. त्यामुळे यंदा पाेळा सण सार्वजनिकरीत्या साजरा करण्यास मनाई करण्यात आली आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या